Published On : Mon, Apr 26th, 2021

२० मेट्रीक टनचा ऑक्सिजन टॅकर नागपुरात पोहोचला

नागपूर : नागपूरसाठी २० मेट्रीक टन ऑक्सिजन घेऊन एक टँकर सोमवारी सकाळी पोहोचला. हे टँकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रिकामा करण्यात आला.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने तिसरे ऑक्सीजन टँकर नागपूरला प्राप्त झाले आहे. महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी याबद्दल जायसवाल निकोचे अध्यक्ष श्री बसंतलाल शॉ, सहप्रबंध संचालक रमेश जायसवाल आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.