Published On : Wed, May 28th, 2025
By Nagpur Today Nagpur News

वाढदिवसाला मिळालेले प्रेम अन् शुभेच्छांनी भारावलो केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केली कृतज्ञता

Advertisement

नागपूर – वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘वाढदिवसाला मिळालेले प्रेम अन् शुभेच्छांनी भारावलो’, या शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींसह देशभरातील मान्यवरांनी ना. श्री. गडकरी यांना सोशल मीडिया तसेच दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्यांमधील चाहते, कार्यकर्ते, उद्योजक, सांस्कृतिक-सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींनी समाजमाध्यमे, वृत्तपत्र तसेच लेख व इतर मजकुराच्या माध्यमातून ना. श्री. गडकरी यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. ना. श्री. गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित झालेल्या विशेषांकांमध्ये अनेकांनी लेख प्रकाशित करून ना. श्री. गडकरी यांच्या व्यक्तिमत्वाचा तसेच त्यांच्या कार्याचा गौरव केला. या सर्वांबद्दल ना. श्री. गडकरी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. यामध्ये राजकीय, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय आदी क्षेत्रांमधील मंडळींचा समावेश आहे.

Gold Rate
04Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,48,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार कृष्णा खोपडे, आमदार किशोर जोरगेवार, आमदार चरणसिंग ठाकूर, प्यारे खान, माजी महापौर माया ईवनाते, नरेश व साधना बरडे, केसीसी ग्रुपचे निहार खळतकर, प्रफुल्ल देशमुख, अशोक जयस्वाल, श्रीकांत जोशी, अजित पटेल आदींचा समावेश आहे. याशिवाय फिनोलेक्स पाईप, झुलेलाल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, चाफेकर अँड कंपनी, आवरेसकर अँड सन्स, वेदिका ग्राफिक्स, रोशन रिअल इस्टेट, पगारिया ग्रुप, कॅपिटल फर्निचर, गॅलक्सी सोलर तसेच भाजप मध्य नागपूर, काटोल-नरखेड भाजप, भाजप चिचोली (खापरखेडा) व वलनी जिल्हा परिषद सर्कल आदींचा समावेश आहे.

‘व्हर्टिकल डिजीटल डिस्प्ले’ ठरला आकर्षण

ना. श्री. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एक खास ‘व्हर्टिकल डिजीटल डिस्प्ले’ भेट दिला. एखाद्या पोडिअमप्रमाणे दिसणाऱ्या या डिस्प्लेमध्ये एक स्क्रीन लागला आहे. त्यावर ना. श्री. गडकरी यांच्या विभागामार्फत झालेली कामे, त्यांचे सामाजिक कार्य, नागपूरसह संपूर्ण देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केलेली कामे आदींच्या संदर्भातील व्हिडिओ बघायला मिळतात. यामध्ये दोन माईक्स देखील आहेत. त्यामुळे त्याचा पोडिअम म्हणून देखील वापर होऊ शकतो. चंद्रपूरमधील तरुणांनी याची निर्मिती केली आहे. ना. श्री. गडकरी यांनी या तरुणांचे देखील कौतुक केले.

Advertisement
Advertisement