Published On : Thu, Jul 23rd, 2020

मास्क न वापरणाऱ्या ३३० व्यक्तींवर एक लाख च्या वर दंड वसूल

नगरपरिषद, व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई कारवाई।

जिल्हाधीकारी रवींद्र ठाकरे यांचे आदेशा नुसार नवीन दंड 500/- वसूल ची अमलबजाणी.मास्क सोबत सोशल डिस्टसिंग चे पालन करणे आज काळाची गरज मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांचे प्रतिपादन

रामटेक: कोरोना संक्रमणाच्या काळात स्वतःच्या सुरक्षेला खुप जास्त प्रमाणात महत्व असून प्रशासन सातत्याने जनजागृती करीत आहे. सुरक्षेच्या कोणकोणत्या उपाययोजना करण्यात याव्या याची निरंतर माहिती देत आहेत. पंरतु सार्वजनिक ठिकाणी फिरतांना नागरिक नियमांची अमलबजावणी करताना दिसत नाही. त्यामुळे मुख्याधिकारी स्वरूप खारगे, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या संयुक्त पथकाने रामटेक शहरात बस स्टँड व इतर ठिकाणी कारवाइ करत मास्क नसलेल्या नागरिकांवर कारवाईचा बडगा सुरू केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताप्रसाद शेंडगे , पोलिस उपनिरीक्षक कोळेकर , हत्तीमारे ,नगरपरिषद चे अधीकारी राजेश सव्वालाखे, रोहित भोईर व कर्मचारी वर्गाने कारवाई करत एकूण १३ दुकाने 2000 प्रमाणे 26000/- रुपये वसूल केले.
मास्कसाठी अगोदर 200/- दंड होता, जिल्हाधीकारी रवींद्र ठाकरे यांचे आदेशानुसार नवीन दंड 500/- वसूल केला गेला .अंदाजे 330 पेक्षा जास्त व्यक्तींवर कारवाई झाली आहे.
आतापर्यंत एकूण दंडाची वसुली एकूण एक लाखाच्या वर केली गेली असल्याचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे, यांनी सांगितले

लॉकडवूनच्या काळात नागरिकांकडून नियमात कोणत्याही प्रकारची हयगय झाल्यास अशी मोहीम नेहमीच प्रशासनाच्या वतीने सुरू राहील.
कारवाई झालेल्यांमध्ये अनेक सुशिक्षित नागरिकांचा समावेश असणे ही सर्वात खेदजनक आहे.

नागरिकांनी बाहेर पडताना मोबाईलपेक्षा मास्क अवश्य बांधावे.

अनेक नागरिक मॉर्निंग वॉक, एव्हीनिंग वॉक करतात. ठिकठिकाणी लावलेल्या ओपन ग्रीन जिम वर व्यायाम करतात. अश्या कारणांसाठी बाहेर पड ताना देखील मास्क सोबत सोशल डिस्टसिंगचे पालन करणे आज काळाची गरज आहे..नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे. विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. आपली सुरक्षा आपणा स्वतःलाच करायची आहे. नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे असे निवेदन मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांनी केले आहे.