गोंदिया : अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनसोड यांच्या ताफ्याला संतप्त कार्यकर्त्यांनी अडवून त्यांना परत जाण्यास सांगितले.
यावेळी पटोले यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनसोड अर्ज भरण्यासाठी आले होते. दरम्यान, बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिल्याने संतप्त झालेल्या स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि डॉ.प्रशांत पडोळे यांचा ताफा अडवून संताप व्यक्त केला.
तसेच ‘बाहेरचे पार्सल’ चालणार नाही, अशा घोषणाही दिल्या. स्थानिक नेत्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली.