Published On : Wed, Aug 12th, 2020

बिनासंगम येथे शेतकरी, शेतमजुरासाठी प्रशिक्षित शिबिराचे आयोजन

कामठी:- तालुक्यातील बिनासंगम येथे तालुका कृषी अधिकारी याचे वतीने आत्मा अंतर्गत कौशल्य आधारित शेतकरी, शेतमजुरासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

बिनासगम येथील शेतकरी भिमराव भडंग याचे शेतावर आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षित शिबिराचे उदघाटन बिनासगम ग्रामपंचयत चे सरपंच नंदा जागडे याचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत, कृषी महाविद्यालय नागपूर चे प्रा एस एन नदनवार, मंडळ कृषी अधिकारी पठारे, कृषी पर्यवेक्षक मनोज कोठे, यासिन शेख उपस्थित होते प्रशिक्षित शिबिरात प्रा नदनवार यांनी खरीप पीक हंगामात शेतकऱ्यानी विवीध पिकासाठी कीटकनाशक औषधाची खरेदी, औषधाचे द्रवन तयार करताना घ्यावयाची काळजी , द्रवणाची पिकांवर फवारणी करन्या विषयासह विविध मुद्द्यांनवर मार्गदर्शन केले,

Advertisement

कृषी प्रवेक्षक मनोज कोठे यांनी प्रशिक्षित शिबिरात कापूस , सोयाबीन, पालेभाज्या पिकांनवर किडीचे व्यवस्थापण विषयावर मार्गदर्शन करीत वनस्पतीजन्य किटनाशक घरच्याघरीच तयार करण्या बाबत माहिती देवुन त्याची प्रात्यक्षिके करून दाखवली कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत करताना खरीप पीक हंगामातील विविध पिका विषयी माहिती दिली, कार्यक्रमाचे संचालन कृषी विभागाचे यासिन शेख यांनी केले व आभार प्रदर्शन एस जाभुलकर यांनी मानले कार्यक्रमाला बिनासगम ग्रामपंचयत चे सदस्य कल्पना धाडे, मंगला उपासे सह शेतकरी , शेमजुर उपस्थित होते

Advertisement

संदीप कांबळे कामठी

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement