Published On : Wed, Sep 22nd, 2021

जागतिक ‘कार फ्री’ दिना निमित्त सायकल रॅलीचे आयोजन

Advertisement

– पर्यावरणाच्या दृष्टीने मेट्रो फायदेशीर: मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने जागतिक ‘कार फ्री’ दिनानिमित्त आज बुधवारी २२ सप्टेंबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सिव्हिल लाईन्स येथील लेडीज क्लब चौकातून सकाळी ६.३० वाजता रॅलीला सुरूवात झाली आणि याद्वारे ‘कार सोडा, सायकल आणि मेट्रो पकडा’ आणि पर्यावरण संरक्षणासाठी मेट्रोचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली.

महा मेट्रो, नागपूर महानगरपालिका, नागपूर पोलिस, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, मिल्स अँड मिलर्स, सायकल फॉर चेंज, इंडिया पेडल्स, लाफ्टर रायडर अँड रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला होता.

पर्यावरणाच्या दृष्टीने मेट्रो आणि सार्वजनिक वाहुतुक फायदेशीर: मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.
जागतिक ‘कार फ्री’ सायकल रॅली मध्ये नागपूर महानगर पालिका आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले कि नागपूर मध्य भारतातील सर्वात मोठे शहर असून येथे नॉन मोटराइज्ड ट्रान्स्पोर्टला (NMT) प्रोत्साहन देण्यात येत आहे. ‘कार फ्री डे ’ च्या निमित्ताने सर्व नागरिकांना त्यांनी आवाहन केले कि दैनंदिन वापरामध्ये कमीत कमी मोटराइज्ड वाहनाचा उपयोग करावा, शहरात उत्कृष्ट दर्ज्याची मेट्रो सेवा तसेच सार्वजनिक वाहुतुक सेवा उपलब्ध असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. हे पर्यावरण आणि स्वास्थाच्या दृष्टीने फायदेमंद आहे.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. मेट्रो प्रवासा सोबतच फिडर सर्विस देखील उपलब्ध आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता मेट्रो ट्रेन मध्ये सायकल नेता येते आणि नागरिकांची याला पसंती मिळत आहे. त्यामुळे आता मेट्रो सोबत सायकल अशी पर्यावरणपूरक प्रवासी सेवा नागरिकांच्या फायद्याची ठरणार आहे. मेट्रोसह्या डब्ब्यांमध्ये सायकल स्वारांकरिता योग्य सूचना फलक तसेच सायकल ठेवण्याकरिता उपयुक्त जागा नेमली आहे.