| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jan 19th, 2019

  न्याय आपल्या दारी” फिरते लोक अदालतीचे आयोजन

  रामटेक तालुक्यातील एकूण ७ प्रकरणाचा निपटारा.

  १५ वर्षाआधीच्या २ प्रकरणांचा निपटारा.

  रामटेक : रामटेक तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ रामटेक यांचे संयुक्त विद्यमाने नुकतेच “न्याय आपल्या दारी” ह्या दोन दिवसीय फिरते लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या फिरते लोक अदालतीचे उदघाटन सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश ओमप्रकाश वर्मा यांचे हस्ते करण्यात आले.फिरते लोक अदालतच्या सदर वाहनाला तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश माणिक वाघ यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सह दिवाणी न्यायाधीश मनोजकुमार बनचरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

  सदर फिरते वाहन ग्रामीण भागात जावून तेथील प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ह्या फिरते लोक अदालत मध्ये एक दिवाणी प्रकरण तसेच 3 फोजदारी प्रकरणे निकाली काढण्यात यश आले. त्यातील एक फोजदारी प्रकरण १५ वर्षांपासून प्रलंबित होते त्या प्रकरणाचा निपटारा करण्यात आले.दरम्यान काचुरवाही ग्रामपंचायत येथे शिबीर आयोजित करण्यात आले. तसेच एकविरा मतिमंद मुलांची निवासी शाळा काचुरवाही येथे आकस्मिक भेट देण्यात आली.

  फिरते लोक अदालत च्या दुसऱ्या दिवशी २ दिवाणी प्रकरणे तसेच १ फोजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आली ह्यामध्ये एक प्रकरण हे १७ वर्ष पासून जुने असलेल्या प्रलंबित प्रकरणाचा देखील निपटारा ह्यावेळी करण्यात आला हे विशेष.

  या आयोजित फिरते लोक न्यायालयाच्या उदघाटन प्रसंगी तालुका वकील संघाचे पदाधिकारी ऍड. महेंद्र येरपुडे, ऍड. पी. बी. बांते, ऍड. ए. वी. गजभिये, ऍड. अरविंद कारामोरे, ऍड. मेश्राम, सहाय्यक गट विकास अधिकारी अशोक मते ,पोलीस उपनिरीक्षक सरकटे,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. फिरते लोकन्यायालय प्रसंगी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुधीर तालेवार, पी. एन. बोरकर, वी. एम. बाजारे,आकाश येरपुडे, नारायण नाकाडे तसेच सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145