Advertisement
नागपूर : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त हुडकेश्वर पोलीस ठाण्यात परिमंडळ क्रमांक 4 च्या वतीने बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत परिमंडळ क्रमांक चार अंतर्गत येणाऱ्या हुडकेश्वर, बेलतरोडी, नंदनवन, अजनी, वाठोडा, इमामवाडा, सक्करदरा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
परिमंडळ क्रमांक चारचे पोलीस उपायुक्त सागर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत सात पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेची पहिली व दुसरी फेरी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात होणार आहे. शेवटची फेरी झोन 4 च्या कार्यालयात होणार आहे. विजेत्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.