Advertisement
नागपूर : राज्यात येत्या चार-पाच दिवसांत मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. नागपूरसह विदर्भातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, जालना, अकोला, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात मान्सून सक्रिय झाला असून राज्याच्या विविध भागांत पाऊसाने हजेरी लावली आहे. नागपूर जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहे. तर महाराष्ट्रातील काही भागांत आज मूसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
नागपुरात पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात सुरु झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.