Published On : Tue, Jul 17th, 2018

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Nagpur : नागपुरात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, सभागृहाचे कामकाज सुरु होण्याआधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहाबाहेर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई देण्यात यावी, बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी विधानसभेबाहेर घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला.

तसेच आपल्या मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी नाशिक ते पुणे असा लॉंगमार्च काढला असता, या सरकारने पोलिसांना हाताशी धरून त्यांचा लॉंगमार्च उधळण्याचा प्रयत्न केला. हे सरकार आशिवासी, अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुनील केदार, आणि इतर सदस्य सहभागी होते.