Published On : Wed, May 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ‘ऑपरेशन यू-टर्न’चा धडाका;गांजाच्या नशेत वाहन चालवणाऱ्या तिघांवर गुन्हे!

Advertisement

नागपूर – शहरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवणाऱ्यांविरोधात नागपूर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. सिताबर्डी ट्रॅफिक झोनच्या वतीने १२ मे रोजी राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन यू-टर्न’ अंतर्गत गांजाच्या नशेत वाहन चालवणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे या मोहिमेत अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग अॅनालायझर मशीनचा वापर करण्यात आला.

वाहतूक पोलिसांनी उशिरापर्यंत नाकाबंदी आणि विशेष तपासणी मोहीम राबवत संशयित वाहनचालकांची तपासणी केली. यावेळी तीन वाहनचालक THC (गांजा) सेवन केल्याचे निष्पन्न झाले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कारवाईतील प्रकरणे
FIR क्रमांक 0274 : कन्नमवार चौक येथे सायंकाळी सुमारे ५.५० वाजता ४२ वर्षीय व्यक्तीला धोकादायक पद्धतीने अल्फा वाहन चालवताना पकडण्यात आले.

FIR क्रमांक 0275 : सिव्हिल लाईन्समधील हिरामल डायनिंग हॉलजवळ २३ वर्षीय युवक हिरो होंडा ग्लॅमर दुचाकीवर संशयास्पद अवस्थेत आढळला.

Advertisement

FIR क्रमांक 0276 : ट्रॅफिक कार्यालयासमोर ५७ वर्षीय ऑटोचालक गांजाच्या प्रभावाखाली वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले.

कोणत्या कलमांखाली गुन्हे?
तिन्ही आरोपींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर पुढील कलमे लावण्यात आली आहेत :

-NDPS Act 1985 च्या कलम 27 अंतर्गत अमली पदार्थ सेवनाचा गुन्हा
-Motor Vehicles Act 1988 च्या कलम 185 अंतर्गत अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवणे
-BNSS कलम 173 अंतर्गत एफआयआर नोंद

दरम्यान ही मोहीम PI अरविंद पुरी आणि API विक्रम शिवलाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पोलीस शिपाई विनय राठोड यांनी कारवाईत सहकार्य केले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत पुढील तपास पाहत आहेत.

नागपूर पोलिसांनी नागरिकांना इशारा देत सांगितले की, “ड्रग्सच्या नशेत वाहन चालवणे हे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. शहरात ‘ऑपरेशन यू-टर्न’ आणखी तीव्र करण्यात येणार असून अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई सुरूच राहील.”

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges