Published On : Fri, May 4th, 2018

जनतेचा अपमान करणाऱ्या माजी खासदाराला धडा शिकवा : ऊर्जामंत्री बावनकुळे

Advertisement

गोंदिया/तिरोडा: मतदारांनी पाच वर्षांसाठी निवडून दिलेल्या माजी खासदाराने साडे तीन वर्षात एकही काम न आणता राजीनामा देऊन जनतेवर निवडणूक लादून जनतेचा अपमान केला. अशा खासदाराला धडा शिकविण्याची हीच वेळ आहे. जनतेच्या अपमानाचा बदला घ्या असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज तिरोडा येथे केले.

तिरोडा येथे कार्यकत्र्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. याचवेळी तिरोडा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला व्यासपीठावर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, आ. विजय रहांगडाले, भाजपा गोंदिया जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, नगर परिषद अध्यक्ष सोनाली देशपांडे, माजी आ. भजनदासजी वैद्य, आ. हरीश मोरे, श्रीमती बघेले, लक्ष्मण भगत, विकास तोतडे, भाऊराव कठाने, धनेंद्र अटरे, पक्षाचे संघटनमंत्री वीरेंद्र अंजनकर, ईश्वर ठोंबरे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

तिरोड्यातील श्याम मंगलम लॉन येथे झालेल्या या सभेला भरगच्च कार्यकत्र्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले- मी कार्यकत्र्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. येथील भाजपाचा कार्यकर्ता हा सक्षम आहे. पाच वर्षे दिल्लीत आपल्या भागाचे प्रश्न मांडून विकास कामांसाठी निधी खेचून आणण्याऐवजी माजी खासदाराने जनतेशी बेईमानी केली. जनतेचे मतांच्या रुपाने घेतलेल्या कर्जाजी फेड न करता जनतेवर पुन्हा निवडणूक लादली. कुवत असेल तर दिल्लीसारख्या महासागरातून निधी आणणे शक्य आहे. पण साडे तीन वर्षात माजी खासदाराने एकही काम केले नाही.

महाराष्ट्र शासनाने शेतकèयांना कर्जमुक्ती दिली. विविध योजना आणल्या. ऊर्जा विभागातर्फे भंडारा गोंदियात ६०० कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. आता या भागातील सर्व नळयोजना सौर ऊर्जेवर आणणार आहे. शेतकèयांना दिवसा वीज देण्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्या भागाचा चौफेर विकास करायचा असेल तर बेईमान माजी खासदाराला धडा शिकवा असेही बावनकुळे म्हणाले.

विकासाला खीळ घातली : राजकुमार बडोले
भाजपाने उमेदवारी देऊन व मोदींच्या नावावर निवडून आलेल्या माजी खासदाराने साडे तीन वर्षात विकासाला खीळ घातल्याची टीका गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली. ते पुढे म्हणाले- माजी खासदाराने मतांचे घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे त्याचा बदला घेण्याची हीच वेळ आहे. अशा बोलघेवड्या नेत्याला त्याची जागा दाखवा. महाराष्ट्र शासनानेच या भागात कामे केली आहेत. मालगुजारी तलावातील गाढ काढणे, जलयुक्त शिवारची कामे, शेतकèयांना ७/१२ घरपोच देणे, दिव्यांगांना प्रमाणपत्र देणे असे एक नाही तर अनेक निर्णय या शासनाने सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारे घेतले आहे. कार्यकत्र्यांनी शासनाची ही कामे घरोघरो पोहोचवावी आणि जनतेनेही महाराष्ट्र शासनाच्या कामाची दखल घेऊन निवडून लादणाèया माजी खासदाराला पुन्हा घरी पाठवावे असे आवाहन बडोले यांनी केले.

आ. विजय रहांगडाले, हेमंत पटले यांनीही मतदारांना माजी खासदाराला त्याची जागा दाखवून देण्याचे आवाहन केले. या मेळाव्याला तरुण कार्यकत्र्यांची संख्या उल्लेखनीय होती.