Published On : Wed, Apr 18th, 2018

कन्हान ला विधी सेवा मदद केंद्राचे उदघाटन

Vidhi Help Centre at Kanhan
कन्हान: पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हान ता.पारशिवनी जि.नागपूर येथे मंगळवार रोजी विधी सेवा अधिकारी म्हणून अँड. श्रीकांत मानकर यांची नेमणूक करून कन्हान पोलीस स्टेशन संलग्न खोली मध्ये रिबीन कापून विधी सेवा मदद केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

आरोपीना लागणारी न्यायिक मदत मिळावी व योग्य कायदेशीर सल्ला मिळावा या मु़ख्य उद्देशाने विधी सेवा समितीच्या वतीने कन्हान येथे मंगळवार दि. १७ एप्रिल ला सायंकाळी ६. ३० वाजता दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे प्रथम न्यायाधीश ए. डी. तिडके, सहदिवाणी न्यायाधीश एस. ए. पाटील, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश आर. पी.  बाथे, तिसरे सहदिवाणी न्यायाधीश व्ही. एम. एम. गायकवाड, पुडके, कन्हान पोलीस स्टेशनचे निरिक्षक मा. चंद्रकांत काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कन्हान पोलीस स्टेशन संलग्न खोली मध्ये रिबीन कापून विधी सेवा मदद केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

Vidhi Help Centre at Kanhan
येथे अँड. श्रीकांत मानकर यांची नेमणूक करण्यात आली. यामुळे कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नागरिकांची विधी (कोर्टाच्या) कामकाजा विषयी योग्य मार्गदर्शनाच्या अभावी मोठय़ा प्रमाणात फसवणूक होत होती. नागरिकांच्या या फसवणुकीवर आळा बसणार असल्याने या विधी सेवा मदत केंद्राचे सर्वसामान्य नागरिकांन कडुन स्वागत होत आहे.