नागपूर: सध्या ऑनलाईन खरेदीचा जमाना आहे. काही ग्राहकांनी मद्यविक्री ही देखील ऑनलाईन मंजूर करावी असे प्रस्ताव शासनाला दिले आहे. या संदर्भात अनेक अर्ज शासनाकडे प्रलंबित आहेत. पण कायद्यानुसार ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी देणे शक्य नसून तो एक गुन्हा आहे. त्यामुळे ऑनलाईन मद्यविक्रीचा शासनाचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट मत उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्री ही नियमानुसार केवळ शासनाने मंजूर केलेल्या दुकानातूनच करण्यात येते. यात कोणताही बदल करण्याचा शासनाचा मानस नाही. मद्यविक्री ऑनलाईन करण्यात येत असल्याबद्दलचे विविध प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्द झालेले वृत्त हे खोडसाळ आहे.
ऑनलाईन किंवा अन्य मद्यविक्रीला प्रोत्साहित करणे हेदेखील कायद्याला धरून नाही. त्यामुळे ऑनलाईन मद्यविक्रीचा शासनातर्फे कोणताही विचार नाही, असेही ना. बावनकुळे यांनी म्हटले आहे.

