Published On : Fri, Mar 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरात ऑनलाईन फसवणूक; दुबई टूरच्या आमिषाने नागरिकाची १.६८ लाखांची फसवणूक!

Advertisement

नागपूर : सोशल मीडियावर दाखवण्यात आलेल्या दुबई टूर पॅकेजच्या आमिषाला बळी पडत शहरातील एका नागरिकाची तब्बल १ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

प्रभात सालवे असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते जानेवारी २०२५ मध्ये कुटुंबासोबत दुबई सहलीचे नियोजन करत होते. याच दरम्यान त्यांना फेसबुकवर ‘नो कॉस्ट ईएमआय’वर दुबई टूर देण्याची जाहिरात दिसली. ही जाहिरात ‘PAQ ट्रिप अँड टूर्स’ या ट्रॅव्हल कंपनीच्या नावाने होती.

Gold Rate
Mar 21 2026 - Time 10.22Hrs
Gold 24 KT ₹ 1,45,200 /-
Gold 22 KT ₹ 1,35,000 /-
Silver/Kg ₹ 2,30,800/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जाहिरात पाहून संपर्क साधल्यानंतर खुदी सॅक्सेना, लक्ष्य अरोरा आणि अमीन अशी नावे सांगणाऱ्या व्यक्तींनी सालवे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी आकर्षक टूर पॅकेज ऑफर करत विश्वास संपादन करण्यासाठी बनावट व्हिसा कागदपत्रे तसेच इंडिगो एअरलाईन्सकडून आल्याचा भास निर्माण करणारा खोटा ईमेलही पाठवला.

या कागदपत्रांवर विश्वास ठेवून सालवे यांनी सांगितलेल्या खात्यावर १.६८ लाख रुपये जमा केले. मात्र, प्रवासाची तारीख जवळ येताच संबंधितांकडून टाळाटाळ सुरू झाली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सालवे यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी फसवणूक व आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement