Published On : Mon, Feb 24th, 2020

दीड लाख रूपये किंमतीचे एक टन प्लास्टिक जप्त

Advertisement

गुन्हे शाखा पथकाद्वारे कारवाई : उपद्रव शोध पथकाद्वारे दंड वसुल

नागपूर: महाराष्ट्र शासनातर्फे प्रतिबंधित करण्यात आलेल्या प्लॉस्टिक पिशव्यांची अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन वर्धा रोड चिचभवन येथे गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ द्वारे सोमवारी (ता.२४) पकडण्यात आले. गुप्त माहितीद्वारे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये सुमारे दीड लाख रुपये किंमतीचा प्लास्टिक मुद्देमाल जप्त करण्यात आला. मनपाच्या नेहरूनगर झोन उपद्रव शोध पथकाद्वारे वाहन चालकावर कारवाई करीत प्लास्टिक जप्त करून दंड वसुल करण्यात आला.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वर्धा मार्गाने शासनाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक मालाची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ ला मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक पी.एम.मोहेकर व त्यांच्या सहका-यांनी वर्धा रोड चिचभवन येथे सापळा रचला. सदर मार्गावर वाहनांची झडती घेतली असता टाटा एस. वाहन क्रमांक एमएच ३२ क्यू ६०२१ या वाहनामध्ये शासनाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या आढळल्या. नंदनवन पोलिस स्टेशन पथकाद्वारे वाहन चालक गिरीश मुरलीधर अदानी (वय ३२ वर्षे) रा. पोतदार बगीचा, गुरूद्वारा रोड रामनगर जि. वर्धा व रवी मुरलीधर अदानी (वय ३० वर्षे) रा. पोतदार बगीचा, गुरूद्वारा रोड रामनगर जि. वर्धा यांच्यासह वाहनातील प्लास्टिकचा मुद्देमाल आणि वाहन ताब्यात घेण्यात आले.

Advertisement

नंदनवन पोलिस स्टेशनद्वारे उपद्रव शोध पथकाला कारवाईची माहिती देण्यात आली. नेहरूनगर झोनच्या सहायक आयुक्तांना पत्र देउन गाडी व प्रतिबंधित प्लास्टिक मुद्देमाल झोनच्या उपद्रव शोध पथकाच्या ताब्यात देण्यात आले. नेहरूनगर झोन उपद्रव शोध पथक प्रमुख नत्थु खांडेकर यांच्या नेतृत्वात पथकाने पंचनामा व जप्तीनामा नियमानुसार तयार करून संपूर्ण माल जप्त केला. प्लास्टिक जप्ती संदर्भातील नियमानुसार प्रथम गुन्ह्याकरीता पाच हजार रूपये दंड पथकाद्वारे वाहन चालकाकडून वसुल करण्यात आला.

Advertisement
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam #news

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी #CyberFraud #InstagramScam #Fraud #JobScam

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV #CrimeBranch #news

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute  #VikasThakre #PoliceAction

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews #nagpur #nagpurnews #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges