Published On : Fri, Sep 8th, 2017

गडचिरोलीत पोलिस जवानांवर नक्षलवाद्यांचा गोळीबार; 1 जवान गंभीर जखमी

Naxlite Attacks on Policeman

गडचिरोली/नागपूर: कोरची पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या कोडगुल पोलिस मदत केंद्रावर कार्यरत असणाऱ्या 2 पोलिस कर्मचाऱ्यांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात आशिष मडावी हा जवान गंभीर जखमी झाला आहे.

मनित हारामी व आशिष मडावी हे दोन जवान मोटारसायकलवरुन कोरची येथे गेले होते. नक्षलवाद्यांनी तेथे त्यांच्यावर गोळीबार केला. मडावी हा या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी मडावी यांच्यावरील उपचारासाठी हेलीकॉप्टर रवाना केले.

मडावी यांना कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार करुन त्यांना हेलीकॉप्टरने नागपुरला नेण्यात आले आहे.