Published On : Fri, Sep 8th, 2017

नो-फ्लाय लिस्ट: गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांवर लादली जाऊ शकते आयुष्यभराची बंदी

Advertisement

नवी दिल्ली: विमानात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांवर कमीत कमी 3 महिने प्रवास बंदी घातली जाणार आहे. DGCA ने प्रथमच नो-फ्लाय लिस्टची नियमावली शेअर केली आहे. यात गैरवर्तनाला तीन प्रकारांमध्ये विभागण्यात आले आहे. यामध्ये कायमची विमानप्रवास बंदी लादण्याचीही तरतूद आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्रालयाने एखाद्या व्यक्तीची माहिती दिली तर त्या व्यक्तीलाही नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकले जाऊ शकते. नागरी हवाई उड्डाण मंत्री जयंत सिन्हा म्हणाले, DGCA ने उचलले हे पाऊल प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीच आहे.

अशा आहेत तीन लेव्हल
1 – पहिल्या कॅटेगरीमध्ये धमकीचा इशारा, हावभाव, मारण्याची धमकी किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असे वर्तन. यात दोषी आढळल्यास प्रवाशावर तीन महिन्यांपर्यंत विमान प्रवासबंदी लादली जाऊ शकते.

2 – दुसऱ्या लेव्हलमध्ये शारीरिक गैरवर्तनाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये धक्का देणे, पायाने मारणे, दाबून धरणे, लैंगिक अत्याचार, चुकीच्या पद्धतीने स्पर्ष करणे. असे करणाऱ्या प्रवाशांवर 6 महिन्यांपर्यंत विमानप्रवास बंदी लादली जाऊ शकते.

3 – तिसऱ्या आणि शेवटच्या लेव्हलमध्ये ज्यामुळे जीवावर बेतण्याची शक्यता असू शकते अशा गैरवर्तनाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 2 वर्षे ते यापेक्षा जास्त काळापर्यंत बंदी घातली जाऊ शकते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.