Published On : Wed, Jul 27th, 2022
By Nagpur Today Nagpur News

स्कार्पिओ ट्रकच्या अपघातात एक जागीच ठार

Advertisement

दोघे गंभीर जखमी

बेला : जवळच्या राष्ट्रीय महामार्गावरील चिमणाझरी शिवारात स्कार्पिओ जीपने समोर पेपर रोल घेऊन जाणाऱ्या 14 चाकी ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. सदर घटना मंगळवारी सायंकाळी 6 वाजता चे सुमारास घडली.

Gold Rate
06 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,52,500 /-
Gold 22 KT ₹ 1,41,800 /-
Silver/Kg ₹ 2,42 300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बेला पोलिसांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार असे कळते की, मंगळवार ,26 जुलैला बेला येथील रहिवाशी भानुदास बापूराव आगवणे ( वय 45 ) हा आपल्या घरील पाहुण्यांना सोडण्यासाठी सोनेगाव( लोधी) फाट्यावर स्कार्पिओ घेऊन गेला होता. त्यांना सोडल्यानंतर भानुदास आगवणे कामानिमित्त बुट्टी बोरी कडे जात निघाला होता. त्यावेळी त्याचे स्कार्पिओ जीपमध्ये राजू शंकर कुंभारे (वय 45) व शुभम बापूराव कोडापे वय 22( दोघेही रा. चीचकोटा) हे बसले होते.

त्यावेळी भरधाव वेगात गाडी असताना त्यांनी चिमणाझरी शिवारात समोर जात असलेल्या पेपर रोलच्या मोठ्या ट्रकला ( क्र. RJ 09- GC-7224) मागील बाजूने जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की स्कार्पिओ रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली व त्यातील शुभम कोडापे याचा जागीच घटनास्थळी मृत्यू झाला. स्कार्पिओ चालक भानुदास आगवणे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना नागपूरच्या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले तर राजू कुंभारे यास शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले.

अपघाताची वार्ता कळताच बेला पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जाम झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. स्कार्पिओ चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास ठाणेदार पंकज वाघोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार श्याम मरसकोल्हे व बेला पोलीस करीत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement