Published On : Fri, Sep 6th, 2019

शिक्षकदिनी भरली विद्यार्थ्यांची एक दिवसीय शाळा

Advertisement

पाराशिवनी: पारशिवनी येथिल राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी येथे शिक्षक दिनानिमित्त ‘एक दिवसाची शाळा’ या अभिनव उपक्रमांतर्गत ५ सप्टेंबरला विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळा संचलित केली. यात प्राचार्य, शिक्षक, लिपिक व शिपाई या भूमिका विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या वठविल्या.

यावेळी कार्यक्रमाध्यक्षा प्राचार्या सौ. जांभूळकर, प्रमुख अतिथी प्रा. ताराचंद चव्हाण, पारशिवनी, केंद्रप्रमुख मा. चंद्रशेखर दलाल यांचे हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, म. जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व अभिवादन करून एक दिवसाच्या शाळेतील सहभागितांना उत्कृष्ट शिक्षक व प्रश्न मंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. *प्रमुख अतिथी प्रा. चव्हाण यांनी बोलतांना, “शिक्षक हा राष्ट्र निर्मितीचा पाया असून प्रत्येक शिक्षकाने प्रामाणिकपणे कर्तव्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.”

यावेळी मंचावर शाळेचे शिक्षक सर्वश्री राजीव तांदूळकर, राजू बर्वे, चंद्रशेखर भोयर, प्रा. अरविंद दुनेदार, दिलीप पवार, सतीश जुननकर, अमित मेश्राम, शैलेश देशमुख, प्रा. सुनील वरठी, सौ. तारा दलाल, सौ. अर्चना येरखेडे, प्रा. मोहना वाघ, सौ. मानेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक साक्षोधन कडबे व नीलकंठ पचारे यांनी केले.

याप्रसंगी उत्कृष्ट शिक्षक म्हणून भाग्यश्री शिलार(१२वी), साक्षी सहारे(१०वी), रसिका डुंबरे(६वी) यांना तसेच प्रश्न मंजुषा स्पर्धा विजेता डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन गटातील प्रिया आरसे, आरती कोडवते, हर्षा डुंबरे, सलोनी सांडेल, माही लांजेवार, मोहित चक्रवर्ती, कावेरी शिवणकर, अजिंक्य डायरे यांना तसेच विद्यार्थी पर्यवेक्षक धीरज बावणे यांना पुरस्कार प्रदान करून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. *सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने प्राचार्या सौ. जांभूळकर, केंद्रप्रमुख श्री. दलाल व प्रा. ताराचंद चव्हाण यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी लिलाधर तांदुळकर, मोरेश्वर दुनेदार, गोविंद कोठेकर, रशीद शेख, सौ.दाढे व विद्यार्थ्यांनी यांनी मोलाचे सहकार्य केले. वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

– कमल यादव,पाराशिवनी