Published On : Fri, Jul 24th, 2020

आज एकाच दिवशी 36 रुग्ण आढळले कोरोना पॉजिटिव्ह

Advertisement

नवीन कामठी पोलीस स्टेशन चा एक पोलीस कर्मचारी निघाला कोरोना पॉजीटिव्ह

.कामठी ता प्र 24:-कामठी तालुक्यातील शहरी भागात कोरोनाचा ब्लास्ट झाला असून कोरोना पोजिटीव्ह ची संख्या ही दिवसागणिक वाढीवर आहे तर आज कामठी तालुक्यात एकूण 36 रुग्ण कोरोनाबधित आढळले असून आजपावेतो एकूण 334 रुग्ण हे कोरोना पोजिटिव्ह आढळले आहेत.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यातील 90 रुग्ण हे कोरोनावर मात घेऊन घरी परतले असून सध्यास्थितीत एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या हि 244 असून आजपावेतो 7 रुग्ण हे कोरोना ने मृत्युमुखी पडले आहेत.

आज कामठी तालुक्यात एकूण 36 कोरोना पोजिटिव्ह आढळल्या रुग्णामध्ये नवीन कामठी पोलीस स्टेशन च्या एका पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे यानुसार
पेरकीपूरा 03,तुंमडीपुरा 01, इस्माईलपुरा 05, न्यू खलाशी लाईन 02, दाल ओली 02, छावणी परिषद 01, जयभीम चौक 03,, जे एन रोड 02, म्हसाळा 01,खसाळा 01,हमालपुरा 01,जुनी ओली 02,हरदास नगर 02, वारीसपुरा 04,उंटखाना 01,भाजीमंडी 01, गोराबाजार 01,खतीजबाई हायस्कुल जवळ 01,शुक्रवारी बाजार 01 रुग्णाचा समावेश आहे. आज आढळलेल्या 36 कोरोनाबधित रुग्णना नागपूर च्या संसथात्मक विलीगिकरण कक्षात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत तर यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या नागरिकांना विलीगिकरन कक्षात हलविण्यात आले.

एसडीओ श्याम मदनूरकर:-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून कोविड फिरते वाहन ची व्यवस्था करण्यात आली आहे या फिरते कोविड वाहनांच्या माध्यमातून कोविड चे लक्षण असलेल्या नागरिकांना तसेच सर्दी , ताप, खासी असलेल्या नागरिकांनी या कोविड वाहनातून स्वतःची कोविड तपासणी करून घ्यावी.

तहसिलदार अरविंद हिंगे:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कामठी शहरातील हॉट स्पॉट ठरलेल्या परिसरातील नागरिकाना सुरक्षात्मक दृष्टिकोनातुन कोरोना चाचणी करण्यात यावी यासाठी शाहजहा कॉम्प्लेक्स येथे तीन दिवसीय कोविड तपासणी शिबीर आयोजित केले आहे .कोरोना चे लक्षण असलेल्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान तहसिलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement