Published On : Fri, Jul 24th, 2020

खैरी तलावात पहाटेर्यवाही करण्याची मागणी

रामटेक – पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत खैरी बिजेवाडा येथे नुकतेच शेतकर्याना पिका साठी पाणी मिळून जमीन ओलित राहावी करिता खैरी मामा तलावाचे खोलिकरंनाचे काम व धार्मिक कार्यक्रम,पूजन,विसर्जन आदी कार्यकम संपन्न व्हावे याकरिता घाट चे बांधकाम करण्यात आले आहे
जिल्हा परिषदेच्या लघुसींचंन विभागा मार्फत झालेल्या या कामाची स्थानिक ग्राम पंचायत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मागणी ला माजी आमदार डी.मल्लिकार्जुंन रेड्डी मान्यता देऊन मंजूर करवुन घेतले होते.

पण ग्राम पंचायत च्या दुर्लक्षपणा मुळे या तलावाजवळ लोक उघड्यावर शौचास बसत आहे .अशा लोकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन स्थानिक परिसरातील धार्मिक संघटनाच्या पदाधिकारी यांनी सभापती सौ ठाकरे मैडम, गटविकास अधिकारी बी डब्ल्यू यावले,पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे यांना देण्यात आले आहे.