Published On : Mon, Jun 8th, 2020

बोगस कपासी बियाणेसह एका आरोपीस अटक, एक फरार

जिल्हा कृषी अधिका-यांची कार्य वाही आठ हजाराचे बियाणे जप्त.

कन्हान : – शेतक-याकडुन प्राप्त माही ती वरून नागपुर जिल्हा कृषी विभागा व्दारे धाड टाकुन डुमरी खुर्द येथे अवैध रित्या बोगस कपाशी बियाणे विक्री कर ण्याच्या उद्देशाने ११ पाकीट किमंत ८०३० रूपयाचे आपले घरीच बाळगत असल्याने पकडुन जिल्हा कृषी अधिका री पंकज लोंखडे यांच्या तक्रारी वरून क न्हान पोलीसानी आरोपी विजय श्रीरामे यास अटक केली असुन मुख्य आरोपी मालक अप्पाराव फरार आहे.

शनिवार दि ६ जुन ला दुपारी २ वाज ता दरम्यान विजय बळीराम श्रीरामे रा डुमरी(खुर्द) यांचे घरी प्रतिबंधित कपाशी चे बियाणे विनापरवाना अवैधरित्या वि क्री करण्याच्या उद्देशाने घरीच बाळगत असल्याने जिल्हा कृषी अधिकारी पंकज लोंखडे धाड टाकुन कन्हान पोलीसाच्या मदतीने बोगस कपाशी बियाण्याचे ११ पॉकीट किंमत ८०३० रूपयाचे पकडुन आरोपी विजय श्रीरामे यास विचारपुस केली. तो अप्पाराव यांचे कडे नौकर अ सुन मालकाचे बियाणे असल्याचे सांगि तल्याने जिल्हा जिल्हा कृषी अधिकारी पंकज लोंखडे यांच्या तक्रारीने कन्हान पोलीसानी आरोपी विजय श्रीरामे व अप्पाराव यांचे

विरूध्द कलम ४२०,४६८ ,४७१ भादंवि, बीज अधिनियम १४, बि याणे (नियंत्रण) आदेश १९८३ चे कलम ३, बियाणे नियम १८६८ चे कलम ८, ९, १० नुसार गुन्हा नोंद करून आरोपी विजय श्रीरामे यास अटक केली असुन मुख्य आरोपी मालक अप्पाराव अद्याप फरार आहे. ही कार्यवाही जिल्हा कृषी अधिकारी पंकज लोंखडे व कन्हान पोलीस स्टेशन चे रविंद्र चौधरी, एस जी परतेती, उईके, एस पी गावंडे, एस बी गेडाम आदीने केली असुन थानेदार अरूण त्रिपाठी यांचे मार्गदर्शनात पोसनि जावेद शेख व प्रविण चव्हाण करित आहे.