Published On : Mon, Nov 27th, 2017

संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मनपातर्फे अभिवादन


नागपूर: भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाची प्रत राष्ट्राला अर्पण केली. त्याप्रीत्यर्थ नागपूर महानगरपालिकेतर्फे स्थायी समिती सभापती संदीप जाधव, माजी महापौर व आमदार प्रा.अनिल सोले यांनी संविधान चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले.


यावेळी राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड, नगरसेवक ॲड. धम्मपाल मेश्राम, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, नगर सेवक सर्वश्री सुनील हिरणवार, जितेंद्र घोडेस्वार, किशोर जिचकार, नरेंद्र वालदे, नगरसेविका पल्लवी श्यामकुळे, ॲड. मिनाक्षी तेलगोटे, मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, मनपा कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड, अशोक मेंढे, सतीश सिरसवान, भोलानाथ सहारे, बबली मेश्राम, मो. जमील अन्सारी, सुनील शंकर, विजय भैसारे, अजय झंझोटे, सुभाष पारधी, अजय करोसिया आदी उपस्थित होते.