Published On : Thu, Jan 23rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन

Advertisement

नागपूर : “तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दुंगा” भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला उत्पन्न करणारी घोषवाक्य देणारे भारत मातेचे वीर सुपुत्र महान स्वातंत्र्य सैनानी, थोर क्रांतीकारक, भारतरत्न, देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदु हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे गुरुवारी (23) आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी अति. आयुक्त श्री. अजय चारठाणकर, उपायुक्त श्रीमती विजया बनकर, सहा आयुक्त श्री श्याम कापसे, सहा. विधी अधिकारी श्री. सुरज पारोचे, जनसंपर्क अधिकारी श्री. मनिष सोनी, अमोल तपासे, जितेश धकाते व इतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच सीताबर्डी मानस चौकातील व सतरंजीपूरा चौक येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्य पुतळयाला माल्यार्पण करण्यात आले, मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.