Published On : Thu, Sep 17th, 2020

सेवा सप्ताह निमित्य खासदार महात्मे द्वारे जिल्ह्यात नेत्रशिबीरांचे आयोजन

नागपुर- पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या निमित्याने 14 से 21 सप्टेंबर हा “सेवा सप्ताह” पाळण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्यसभा खासदार पद्मश्री डाॅ विकास महात्मे यांनी महात्मे आय बॅक आय हाॅस्पीटल च्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नेत्रशिबीरांचे आयोजन केले आहे.

पारशिवनी तालुक्यातील संसद आदर्श गाव भागेमाहेरी, कुही, शारदा नगर खरबी नागपूर, ई. शिविर घेण्यात आले. या शिविरात नि:शुल्क नेत्रतपासणी, चश्मे वाटप करण्यात आले. तसेच गरजू रूग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिविरांमध्ये भाजप कार्यकर्तेही उस्फूर्त पणे सहभागी होत आहेत.

दिल्ली येथे संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने खासदार डाॅ महात्मे स्वत: शिविरात सहभागी होऊ शकत नसले तरी त्यांची टीम – वासुदेव खोब्रागडे, सतीश बुरघाते ,श्रीकांत जांभूळकर, राकेश पाटील,निश्चल वरूडकर, प्रशांत निवांत हे पूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत.