Published On : Sat, Dec 30th, 2023

नागपुरात नववर्षाच्या पूर्वसंध्येला चोख पोलीस बंदोबस्त तैनात ; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचना

Advertisement

नागपूर : नववर्षाच्या जल्लोषात कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून नागपुरात तब्बल २ हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. ३० ठिकाणी नाकाबंदी केली जाणार असून मद्यपींना आवरण्यासाठी ३० ठिकाणी विशेष बंदाेबस्त कारण्यात आला आहे, नागपुरातील पोलीस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अमितेश कुमार यांनी माहिती दिली.

शासनाने नववर्षाच्या स्वागतानिमित्त नागरिकांचे मनोरंजन व्हावे म्हणून ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून पहाटे ५ पर्यंत उपाहारगृह, हाॅटेल्स, रेस्ट्राॅरेन्ट सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.

महिलांसोबत अनुचित प्रकार घडू नये म्हणूनही त्यांना काळजी घ्यावी लागेल.

स्वत:हून नियम पाळल्या जात असलेल्या ठिकाणी पोलीस जाणार नाहीत. परंतु कुठे अनुचित प्रकार घडताना दिसल्यास प्रतिष्ठान बंद करायला लावतील. परवानगी असलेल्या हाॅटेल्समध्ये पहाटे ५ पर्यंत मद्य उपलब्ध करण्याची परवानगी आहे. परंतु परवानगी नसलेल्या उपाहारगृहासह इतर ठिकाणी मद्य दिले जात असल्यास कारवाई केली जाईल.

शहरातील महत्त्वाच्या भागात ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या कारवाईसाठी ३० ठिकाणी पोलीस तैनात राहतील. पोलिसांची कारवाई पारदर्शी व्हावी म्हणून हे पथक सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या ठिकाणी राहील. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी कलम १४४ अन्वये अधिसूचनाही काढल्याची माहिती, अमितेश कुमार यांनी दिली.