Published On : Wed, Oct 22nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

दिवाळीच्या दिवशी नागपुरात एका रात्रीत सहा ठिकाणी भीषण आग लागल्याने खळबळ!

नागपूर : काल (मंगळवारी) रात्री नागपुरात विविध भागांमध्ये तब्बल सहा ठिकाणी आगीच्या घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली. सर्वात मोठी घटना आठरस्ता चौकाजवळील रिलायन्स स्मार्ट स्टोअरमध्ये घडली. रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास स्टोअरमध्ये अचानक आग लागली. काही क्षणांतच ज्वाळांनी दुकानाचा संपूर्ण ताबा घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानातील सर्व माल खाक झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

शहरातील इतर भागांमध्येही कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना आणि झाडांना लागलेल्या छोट्या आगींच्या घटना नोंदल्या गेल्या. अग्निशमन दलाने वेळेवर घटनास्थळी पोहोचत सर्व आग वेळीच विझवली आणि मोठा अनर्थ टळला.

Gold Rate
22 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,24,500 /-
Gold 22 KT ₹ 1,15,800 /-
Silver/Kg ₹ 1,63,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बारामतीत स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग-
फलटण रोडवरील एका स्क्रॅप गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. काही वेळातच आगीचे लोळ गोडाऊनभर पसरले आणि परिसरात दाट धूर पसरला. नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळविले. जवानांनी अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात स्क्रॅप साहित्य जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

नालासोपारा पूर्वेत चार गोडाऊन जळाले-
साय बाजार इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली. एका गोडाऊनमधून सुरू झालेली आग काही वेळातच शेजारील तीन गोडाऊनमध्ये पसरली. एकूण चार गोडाऊन पूर्णतः जळून खाक झाले. वसई-विरार अग्निशमन विभागाने तीन फायर टेंडर घटनास्थळी पाठवून अथक प्रयत्नांनंतर आग विझवली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Advertisement
Advertisement