अमरावती : काँग्रेस नेते राहुल गांधी विरोधात वादग्रस्त विधान केल्यामुळे बुलढाण्याचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर सर्व स्तरावरून टीका होत आहे. यातच आता भाजपचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनीही राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले.
राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा करणे योग्य नाही, पण आरक्षणाबद्दल राहुल गांधी जे काही बोलले ते भयानक आहे.
त्यामुळे असे कुणी विपरित बोलत असेल, परदेशात जाऊन असे कुणी वात्रटासारखे बोलत असेल, तर जीभ छाटू नये, मात्र त्याच्या जिभेला नक्कीच चटके दिले पाहिजे. अशा लोकांच्या जिभेला चटके देणे अत्यंत आवश्यक आहे. बोंडे यांच्या विधानामुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ,असे विधान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले. या विधानाचा काँग्रेस नेत्यांनी निषेध करत ठिकठिकाणी आंदोलन केले. तसेच गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...





