Advertisement
नागपूर : रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘नौटंकी : द ड्रामा क्लब’तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘किरदार 5.0’ या वार्षिक नाट्य सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, 18 जुलै रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत शंकर नगर येथील साई सभागृहात होणार आहे.
विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव देण्यासाठी नौटंकी क्लबतर्फे दरवर्षी ‘किरदार’चे आयोजन करण्यात येते. यावर्षी आयोजित कार्यक्रमात ‘नौटंकी : द ड्रामा क्लब’च्या सदस्य विद्यार्थ्यांकडून परित्राण, सर्फ रायडर, प्रेम चौराहा आणि किलींग मशीन या एकांकिकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या या रंगमंचीय कलाविष्कारास उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.