Published On : Tue, Apr 19th, 2022
By Nagpur Today Nagpur News

२ मोठ्या गळत्या दुरुस्त करण्याकरिता ओंकार नगर जलकुंभ – २४-तासांचे शटडाऊन २० एप्रिल ला

Advertisement

हनुमान नगर झोन अंतर्गत ओंकार नगर जलकुंभ चा पाणीपुरवठा २४ तास राहणार बाधित ….
शटडाऊन दरम्यान व नंतर.. बाधित भागांत टँकर पुरवठा देखील बंद राहणार..

नागपूर : नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी हनुमान नगर झोन अंतर्गत शताब्दी नगर चौकात उद्भवलेल्या ४५० मी मी व्यासाच्या व्हाल्व मधील गळती तसेच ओंकार नगर जलकुंभावरील इनलेट जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याकरिता २४ तासांचे तांत्रिक शटडाऊन- एप्रिल २०(बुधवार ) सकाळी १० ते एप्रिल २१ (गुरुवार ) सकाळी १० वाजेपर्यंत घेण्याचे नियोजित केले आहे.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ह्या कामादरम्यान शताब्दी नगर चौक येथे ६००x २०० mm व्यासाच्या जलवाहिनीची आंतर जोडणी देखील करण्यात येणार आहे.

या २४ तासाच्या हनुमान नगर झोन अंतर्गत ओंकार नगर जलकुंभावरील भागातील पाणीपुरवठा एप्रिल २० (बुधवार ) सकाळी १० ते एप्रिल२१ (गुरुवार ) सकाळी १० पर्यंत बाधित राहणार आहे तसेच शटडाऊन मधील तांत्रिक काम संपल्यावर एप्रिल २१ (गुरुवार) ला पाणी पुरवठा वेळे नुसार त्या त्या बाधित भागातील पाणी पुरवठा सुरु होणार आहे ….ह्या २४ तासांच्या शटडाऊन कालावधी दरम्यान बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे.

पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग : ओंकार नगर जलकुंभ
ओंकार नगर , अभय नगर, कशी नगर, शताब्दी नगर, जवंजाळ ले आउट , चाफले ले आउट, रहाटे नगर टोळी , रामटेके नगर, राजेश्री नगर, रेणुका विहार कॉलोनी, महात्मा फुले वसाहत, जोगी नगर, हरी ओम नगर, गजानन नगर, ८५ प्लॉट, रतन नगर, साकेत नगर, एकटा सोसाटी, साई नगर, गजानन नगर, श्री हरी नगर, १,२,३ विणकर वसाहत, स्वराज नगर, मानेवाडा ओल्ड, दिवाण ले आउट, स्वामी नगर, सेवादल नगर, वनराई नगर, अतिदीप नगर, बाळकृष्ण नगर, जैगुरुदेव नगर, सेंट्रल रेल्वे , जैवन्त नगर, सिद्धार्थ नगर, कपिल नगर, आणि इतर भाग….

यादरम्यान ओंकार नगर जलकुंभ च्या बराचश्या भागांचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे , त्यामुळे टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने, नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे.

For more information about water supply consumers can contact OCW Helpline No 1800 266 9899.

Advertisement
Advertisement