Published On : Sat, Aug 24th, 2019

जुनी कामठी पोलिसांनी दिले 16 गोवंश जनावरांना जीवनदान,

तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या कारवाहितुन 13 लक्ष 55 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटक, एक पसार

कामठी:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसरातील तीन वेगवेगळ्या घटनास्थळी जुनी कामठी पोलिसांनी काल पासून आज पर्यंत केलेल्या कारवाहित भाजीमंडी येथील अवैध कत्तलखान्यात कत्तलीसाठी जाणाऱ्या 16 गोवंश जनावरांना जीवनदान देत तीन वाहने जप्त करण्यात आली असून यातील दोन आरोपी अटक आहेत तर एक आरोपी पसार होण्यात यशस्वी ठरला यानुसार या कारवाहितुन एकूण 13 लक्ष 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यानुसार भाजीमंडी कडे एम एच 40 एन 2219 ने तीन गोवंश जनावरे वाहून नेत असता पोलिसांनी वेळीच धाड घालून तीन ही गोवंश जनावरांना ताब्यात घेत नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलविन्यात आले तर आरोपी वाहनचालक लोकनाथ उर्फ बबलू पिल्ले वय 20 वर्षे रा.कोळसाटाल कामठी ला अटक करीत जप्त गोवंश जनावरे किमती 60 हजार रुपये व जप्त वाहन किमती 3 लक्ष रुपये असा एकूण 3 लक्ष 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.हो कारवाही काल 23 ऑगस्ट ला सायंकाळी साडे पाच दरम्यान केली.

फुटाना ओली चौक मार्गे भाजीमंडी कडे एम एच 49 डी 1309 ने 9 गोवंश जनावरे वाहून नेत असता दडी मारून बसलेल्या पोलिसांनी वेळीच धाड मारून कत्तलीसाठी जाणारे 9 ही गोवंश जनावरे ताब्यात घेत नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलविण्यात आले असून आरोपी वाहनचालक अजीम सलीम अन्सारी वय 23 वर्ष रा मोतीबाग नागपूर ला अटक करोत जप्त वाहन व गोवंश जनावरे असा एकूण 6 लक्ष 35 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तिसरी कारवाही आज 24 ऑगस्ट ला मचीपूल चौकात करण्यात आली असून एम एच 12 बी व्ही 1004 वाहन जप्त करोत यातील कत्तलीसाठी जाणारे 4 गोवंश जनावरे ताब्यात घेत गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जिवनदान देण्यात आले यातील आरोपी वाहनचालकाणे पळ काढण्यात यश गाठले असून या कारवाहितुन जप्त वाहन व गोवंश जनावरे असा एकूण 3 लक्ष 60 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल, एसीपी राजेश परदेसी यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे व सहकारि पोलीस पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.