Published On : Thu, Mar 12th, 2020

दोन अट्टल चोरटे जुनी कामठी पोलिसांच्या जाळ्यात अजून काही चोरीचे गुन्हे उजेडात येण्याची शक्यता

कामठी – होळीच्या पर्वावर जुनी कामठी पोलिसांच्या जाळ्यात दोन अट्टल चोरटे अटकले असून त्यांच्याजवळून अजून काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद इमरान मोहम्मद इस्माईल वय 26 राहणार रुईगज मैदान चंपाआश्रम च्या मागे मोहम्मद इम्रान हेआपल्या घरी कुटुंबासह झोपले असता अज्ञात चोरांनी दिनांक 2 मार्च चे मध्यरात्री घराचे मागील दाराचे कुलूप तोडून शयनकक्षात प्रवेश करून त्यांच्या ओपो कंपनीचा मोबाईल किंमत पाच हजार रुपये व कपाटातील नगदी 55 हजार रुपये एकूण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता

सकाळी उठल्यावर मोहम्मद इमरान यांना चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जुनी कामठी पोलीस स्टेशन गाठून चोरीची तक्रार केली पोलिसांनी कलम 380 नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला असता दिनांक 9 मार्च ला नागपूर मोमीनपुरा येथे जुनी कामठीचे पोलीस गस्तीवर असताना आरोपी पप्पू उर्फ साजिद शेख जमाल चे वय 25 राहणार चित्तरंजन नगर अब्दुल्ला शहाबाबा दर्गा परिसरकामठी हा यांला पकडण्यात आले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आपण चोरी केली तेव्हा आपल्याला करण शंकर वानखेडे वय 25 राहणार चित्तरंजन नगर अब्दुल्ला शाह बाबा दर्गा परिसर कामठी हाई सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले

त्यांच्या जवळून एक जुना मोबाईल त्याची किंमत 3 हजार 550 रुपये जप्त केला आहे दोन्ही आरोपीची विचारपूस सुरू असून ओपो कंपनीच्या मोबाईल व नगदी 55 हजार रुपये चोरी संदर्भात विचारपूस सुरू आहे या दोन्ही अट्टल चोरांकडून अजून काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे ठाणेदार देविदास कठाळे यांनी सांगितले वरील कारवाई पोलिस पोलिस उपायुक्त नीलोत्पल ,सहाय्यक पोलिस उपायुक्त राजरतन बनसोड ,ठाणेदार देविदास कठाळे यांचे मार्गदर्शनात तंगराजन पिल्ले ,धर्मेंद्र राऊत ,पंकज मारसिंगे, महेश कठाणे यांनी केली

संदीप कांबळे