Published On : Tue, May 18th, 2021

जुनी कामठी पोलिसांनी दिले 12 गोवंश जनावरांना जीवनदान

कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या संजय नगर बंगाली कॉलोनी परिसरातून पांढऱ्या रंगाच्या झेनॉन वाहन
क्र एम एच 40 बी एल 1141 ने 12 गोवंश जनावरे अवैधरित्या वाहून नेत असता पोलिसांनी सदर वाहनावर धाड घालून वाहनातून 12 गोवंश जनावरे ताब्यात घेत नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षीत हलवून गोवंश जनावराणा जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही गतरात्री 11.30दरम्यान केली असून यातील आरोपी ने घटनास्थळाहुन पळ काढण्यात यश गाठले.

तर पोलिसांनी या कारवाहितुन जप्त 12 गोवंश जनावरे किमती 1 लक्ष 80 हजार रुपये व जप्त वाहन किमती 4 लक्ष 50 हजार रुपये असा एकूण 6 लक्ष 30 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करीत पसार आरोपी वाहनचालक व वाहनमालक विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.

ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल, एसीपी रोशन पंडित यांच्या मार्गग्दर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे, बिटमार्शल महेश कठाने, पंकज भारसिंगे, विजय सुभेकर, दिलीप ढगे, शितलप्रसाद मिश्रा यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे.