नागपूर : अहमदनगरच्या एका बेरोजगार युवकाने पोलीस विभागात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. तिला लग्नाचे आमिष दाखवून हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून महिला आठ महिन्याच्या गर्भवती झाली आहे.
यानंतर युवकाने महिलेचा शारीरिक संबंधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी सध्या गर्भवती महिला पोलीस उपनिरीक्षकाने सोलापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून हे प्रकरण नागपुरातील बेलतरोडी पोलीस स्टेशनकडे वर्ग केले. या प्रकरणाची नागपूर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा, फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
३१ वर्षीय पीडित तरुणीची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली होती. २०२३ मध्ये ती पोलीस विभागात रुजू झाली. दरम्यान लग्नासाठी तिने विवाह संकेतस्थळावर ‘बायोडाटा अपलोड’ केला. तिथे ३२ वर्षीय आरोपी युवकाचा बायाडोटा होता. त्यात त्याने शासकीय इलेक्ट्रिकल कंत्राटदार असून इतरही व्यवसाय असल्याची नोंद केली होती. बायोडाटा पाहिल्यावर तो पीडित तरुणीच्या संपर्कात आला. डिसेंबर २०२३ मध्ये तो नागपुर शहरात आला. यादरम्यान त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात अडविले. तसेच तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नापूर्वीच ती महिला अधिकारी गर्भवती राहिली.
त्यामुळे तिने लग्नाची गळ घातली. दोघांनीही आपापल्या कुटुंबियांना प्रेमप्रकरणाबाबत माहिती दिली. दोघांच्याही कुटुंबियांनी लग्न करण्याची तयारी दर्शविली. २०२४ मध्ये आरोपीने तरुणीसोबत लग्न केले. लग्नानंतर आरोपीचे बींग फुटले. पती बेरोजगार असून कुठलाही कामधंदा करीत नाही. एवढेच काय तर त्याने महिला पोलीस अधिकाऱ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना काही ‘न्यूड फोटो आणि व्हिडिओ मोबाईलने काढले होते. ते व्हिडिओ तो एका मैत्रिणीच्या व्हॉट्सअॅपवर पाठवित होता.
ही बाब तिच्या लक्षात येताच पोलीस अधिकारी महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने त्या तरुणाला याबाबत जाब विचारला. त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र, त्याच्याकडे अनेक अश्लिल व्हिडिओ असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दखल केला असून प्रकरण बेलतरोडी पोलिसांकडे वर्ग केले असून नागपूर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.