Published On : Sat, Jul 20th, 2019

सराईत गुन्हेगार सहा महिन्यासाठी हद्दपार

कामठी:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मदन चौक रहिवासी एका सराईत गुन्हेगारास नागपूर शहर पोलीस आयुक्तालय मधून सहा महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले असून या हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांचे नाव मो जमीर वल्द मो हसन वय 40 वर्षे रा मदन चौक कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर हद्दपार झालेल्या या सराईत गुन्हेगारांवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून यासंदर्भात वेळोवेळी प्रतिबंधीत कारवाही करून सुद्धा त्याच्या वर्तणुकीत कुठलाही सुधारणा दिसून येत नसल्याने त्याच्यावर नागपूर शहर पोलिस आयुक्तालय मधून हद्दपार करण्या बाबतच्या प्रस्तावाला डीसीपी कार्यालयातुन मंजुरी मिळाल्यानुसार पोलिस उपायुक्त यांच्या आदेशनव्ये सदर गुन्हेगारास नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिसरातुन सहा महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाही पोलीस उपायुक्त, सहाययक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनार्थ जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे, डी बी स्कॉड चे दिलीप ढगे, प्रवीण घुगल, किशोर गांजरे, विजय सिन्हा, पवन गजभिये, रोशन पाटील, विजय भलावी, अश्विन साखरकर यांनी केली.

संदीप कांबळे कामठी