Published On : Tue, Mar 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महिलांच्या आरोग्याबाबत जागरूती यासाठी ओसीडब्ल्यूचा पुढाकर

मासिक पाळीचे आरोग्य अन् स्वच्छतेबाबत दिले मोलाचे मार्गदर्शन
Advertisement

नागपूर, – अनौपचारिक वसाहतींमध्ये राहणाऱ्या अनेक महिलांसाठी मासिक पाळी हा अजूनही लाज, भीती आणि गैरसमजांनी वेढलेला विषय आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या आरोग्याविषयी संवाद सुरू करण्याचा आणि त्यांना योग्य माहिती देण्याचा एक महत्त्वाचा उपक्रम ऑरेंज सिटी वॉटर्स अर्थात ओसीडब्ल्यूद्वारे राबविण्यात आला. ‘चलो खुशियां बांटें’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने ९ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान नागपूर शहरातील विविध झोनमधील १० ठिकाणी मासिक पाळीचे आरोग्य व स्वच्छता या विषयावर सामुदायिक जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला आणि अनेक वर्षे मनात दडवून ठेवलेल्या प्रश्नांना मोकळेपणाने वाचा फोडली.

या सत्रांमध्ये महिलांना मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची स्वच्छतेची काळजी, आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या बाबी तसेच समाजात प्रचलित असलेल्या चुकीच्या समजुतींबाबत माहिती देण्यात आली. परस्परसंवादी चर्चेमुळे महिलांना आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि तज्ञांकडून योग्य मार्गदर्शन मिळविण्याची संधी मिळाली. अनेक महिलांसाठी हा अनुभव नवा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरला. या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे तळागाळात समाजासाठी काम करणाऱ्या महिलांचा गौरव समुदायातील १३ महिलांचा त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. यामध्ये लेडी वॉटर फ्रेंड्स आणि इतर सक्रिय महिला कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Gold Rate
July 02 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,100 /-
Gold 22 KT ₹ 1,32,800 /-
Silver/Kg ₹ 2,30,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आपल्या परिसरातील स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक विकासासाठी त्या सातत्याने काम करत आहेत. हा उपक्रम केवळ जागरूकतेपुरता मर्यादित नसून महिलांना सशक्त बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. महिलांच्या आरोग्याशी संबंधित विषयांवर खुलेपणाने चर्चा होणे, योग्य माहिती मिळणे आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारणे यामुळे समाज अधिक सक्षम आणि निरोगी बनू शकतो अशी भावना महिलांनी व्यक्त केली. अशा प्रयत्नांमुळे महिलांना माहितीपूर्ण निर्णय घेण्याची ताकद मिळते आणि आरोग्यदायी, जागरूक तसेच समतोल समाज निर्माण करण्यासाठी त्यांचा सहभाग अधिक बळकट होत असल्याचेही महिलांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी NMC-OCW हेल्पलाइन 1800 266 9899 वर संपर्क साधा किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करा.

Advertisement
Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

दुकान के बोर्ड को लेकर विवाद #nagpurnews #viral #vivad #crime #marpeet #latestnews

दुकान के बोर्ड को लेकर विवाद #nagpurnews #viral #vivad #crime #marpeet #latestnews

Nagpur’s Emerging Markets: Opportunities, Challenges & Future Growth | Interview with Pankaj Roshan

Nagpur’s Emerging Markets: Opportunities, Challenges & Future Growth | Interview with Pankaj...

इंस्टाग्राम फ्रेंडशिप बनी खूनी टकराव की वजह... #nagpurnews #crime #instagram #friendship #latestnews

इंस्टाग्राम फ्रेंडशिप बनी खूनी टकराव की वजह... #nagpurnews #crime #instagram #friendship #latestnews

कमाल चौक स्थित हैमर्स कैफे पर पांचपावली पुलिस का छापा #nagpurnews #hukka #parlour #crime #newsupdate

कमाल चौक स्थित हैमर्स कैफे पर पांचपावली पुलिस का छापा #nagpurnews #hukka...

₹50 के विवाद में खूनी हमला ! #nagpurnews #crime #murdernews #newsupdate

₹50 के विवाद में खूनी हमला ! #nagpurnews #crime #murdernews #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges