Published On : Mon, Mar 23rd, 2020

लॉकडाऊन: पाणीग्राहकांसाठी ऑनलाईन बिल भरण्याचा पर्याय

Advertisement

नागपूर,: मनपा-OCWची सर्व झोन कार्यालये व ग्राहक सेवा केंद्रे अत्यावश्यक सेवा म्हणून कार्यरत असली तरीही कोरोन व्हायरसच्या धोक्यामुळे राज्य सरकार व नागपूर महानगरपालिकेच्या आदेशानुसार लागू असलेले लॉकडाऊन लक्षात घेता मनपा-OCWने नागरिकांना ऑनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

मनपा-OCW कार्यालये सुरु असली तरीही पाणीग्राहकांसाठी तेथे भेट देण्यापेक्षा सोप्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत. www.ocwindia.com या संकेतस्थळावर तसेच ‘नागपूर वॉटर’ या अॅपद्वारे मनपा-OCW यांनी नागरिकांसाठी पाणीबिल भरणे सुकर केले आहे. याद्वारे नागरिक आपल्या फोनमधून घरबसल्या पाणीबिल भरू शकतात. ही ऑनलाईन सुविधा सोपी तसेच पारदर्शी आहे.

Gold Rate
29 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,39,100/-
Gold 22 KT ₹ 1,29,400 /-
Silver/Kg ₹ 2,49,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याशिवाय, मनपा-OCWने नागरिकांसाठी पेटीएमची सुविधा देखील आणलेली आहे. पेटीएम हे एक लोकप्रिय अॅप असून नागरिकांच्या सोयीसाठी मनपा-OCW याद्वारेही पाणीबिलाची रक्कम स्वीकारत आहेत.

येथे उल्लेखनीय आहे कि, जवळपास ६०००० ग्राहकांनी आजवर डिजिटल पेमेंट सुविधांचा वापर केलेला आहे. पैकी २५००० दरमहा पाणीबिल भरण्यासाठी ऑनलाईन मोडचा वापर करत आहेत.
सन २०१९-२० मधील (२० मार्च पर्यंत) पाणीबिलाची वसुली रु.१३८.४४कोटी इतकी झाली आहे व वसुलीमध्ये फारशी घट आढळून आलेली नाही.

तरीही, सावधगिरी म्हणून मनपा-OCWने नागरिकांना पाणीबिलाची रक्कम ऑनलाईन भरण्याचे आवाहन केले आहे.

For any other information or complaints regarding water supply please contact NMC-OCW Toll Free Number: 1800-266-9899

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement