Published On : Mon, Mar 26th, 2018

मनपा-OCW करणार चिंचभुवन जलकुंभ येथे गळत्या दुरुस्त; २७ मार्च रोजी

Advertisement

major leakage at telankhedi mandir
नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी चिंचभुवन जलकुंभाच्या आऊटलेटवरील गळतीच्या दुरुस्तीचे काम मंगळवार २७ मार्च रोजी ठरवले आहे.

गळत्या तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे. यासाठी किमान १२ तासांचा अवधी लागणार आहे. सकाळी १० ते रात्री १० या वेळेत २७ मार्च रोजी चिंचभुवन जलकुंभ येथे काम करण्यात येईल.

यामुळे चिंचभुवन (कर्वे नगर) जलकुंभ सेवाक्षेत्रातील खालील भागांना २७ मार्च रोजी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.: नरेंद्र नगर, मनीष नगर, शिल्पा सोसायटी १, २, ३, ४, ५ जयदुर्गा लेआऊट १, २, ३, ४, ६ जय हिंद सोसायटी १, २, ३ श्याम नगर, चिंचभुवन जुनी बस्ती, मेहेर बाबा कॉलोनी, काचोरे पाटील नगर, संताजी सोसायटी, मेंघरे लेआऊट, मस्के लेआऊट, सर्वत्र नगर, काचोरे लेआऊट, बोरकुटे लेआऊट, म्हाडा कॉलोनी, दीनप्रजाहित सोसायटी, आदिवासी सोसायटी, गोंडवाना नगर, पंचतारा सोसायटी, अमर संजय सोसायटी, गीतांजली सोसायटी, नगर विकास सोसायटी, PMG लेआऊट, साईकृपा सोसायटी, सुरज सोसायटी, पायल पल्लवी सोसायटी, भारतीय सोसायटी, वैशाली नगर, कन्नमवार नगर, इंगोले नगर, मॉडर्न सोसायटी, मधुबन सोसायटी, समाज भूषण सोसायटी, सप्तगिरी सोसायटी, नवनाथ सोसायटी.