Published On : Thu, Apr 12th, 2018

OCW करणार लक्ष्मी नगर वाहिनीची, पेंच ४ मुख्यावाहिनीसह आंतरजोडणी, 13 एप्रिल रोजी

Advertisement


नागपूर: मनपा-OCW यांनी पेंच ४ फीडर लाईन ७००मिमी व्यासाच्या लक्ष्मी नगर फीडर मेनची जटाशंकर मंदिर, WCL मुख्यालय येथे आंतरजोडणी करण्याचे ठरवले आहे. यासाठी लक्ष्मी नगर फीडर मेनवर १२ तासांचे शटडाऊन घेणे आवश्यक आहे. हे शटडाऊन १३ एप्रिल रोजी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत घेण्यात येईल.

यामुळे १३ एप्रिल रोजी सिव्हीललाईन्स डायरेक्ट टॅपिंग, IBM डायरेक्ट टॅपिंग, राम नगर जलकुंभ व लक्ष्मी नगर जुने जलकुंभ यांचा पाणीपुरवठा बाधित राहील.

या १२ तासांच्या शटडाऊनमुळे खालील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील:

सिव्हील लाईन डायरेक्ट टॅपिंग: सिव्हील लाईन्स, मरियम नगर, रवींद्रनाथ टागोर रोड, VCA रोड, पाम रोड, शासकीय मुद्रणालय

IBM डायरेक्ट टॅपिंग: रवी नगर, तेलंगखेडी हनुमान मंदिर भाग

राम नगर जलकुंभ: गिरीपेठ, त्रिकोणी पार्क, राम नगर चौक, लक्ष्मी नगर चौक, गोकुळपेठ, खरे टाऊन, शंकर नगर, गांधी नगर, शिवाजी नगर, धरमपेठ. विद्यापीठ ग्रंथालय, लॉ कॉलेज चौक, अंबाझरी

लक्ष्मी नगर जुने जलकुंभ: आनंद नगर, RBIकॉलोनी, VNIT कॅम्पस, तात्या टोपे नगर, लक्ष्मी नगर आठ रस्ता चौक, वसंत नगर, रहाटे कॉलोनी, बजाज नगर, लक्ष्मी नगर, स्वीपर मोहल्ला, लक्ष्मी नगर स्लम, माधव नगर, प्रताप नगर काही भाग, अत्रे लेआऊट, अभ्यंकर नगर, लक्ष्मी नगर RPTS रोड, शिव-साहिल अपार्टमेंट, महापौर निवास, बुटी लेआऊट, धनगरपुरा, श्रद्धानंदपेठ, डोंगरे लेआऊट, P&T कॉलोनी, गिट्टीखदान लेआऊट, NIT कॉलोनी, पोस्टल ऑडीट कॉलोनी, इन्कम टॅक्स कॉलोनी, कोतवाल नगर, पब्लिक को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी, S E रेल्वे कॉलोनी.

नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.