Published On : Sat, May 24th, 2025
By Nagpur Today Nagpur News

OCW ने दीर्घकालीन पाणीपुरवठा व दूषिततेच्या समस्या सोडविल्या…

Advertisement

नागपूर:, पाणीपुरवठा सुधारण्याच्या आणि सार्वजनिक आरोग्य सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ऑरेंज सिटी वॉटर (OCW) ने सतरंजीपुरा झोनमधील विविध कमांड क्षेत्रांतील विकट दीर्घकालीन दूषित व अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्यांचे यशस्वी निराकरण केले आहे. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि तांत्रिक उपाययोजनांमुळे नागरिकांना आता स्वच्छ, पिण्यायोग्य पाणी वाढीव कालावधीसह व योग्य दाबाने मिळत आहे.

वांजरी कमांड एरिया (विनोबा भावे नगर, संतोष नगर, कुंदनलाल गुप्ता नगर): या भागांमध्ये प्रदूषित पाण्याच्या समस्यांचा फार जुना इतिहास होता. पूर्वी दीड तास पुरवठा वेळेमध्ये 15-20 मिनिटे प्रदूषित पाणी मिळायचे. OCW ने सांडपाण्याच्या चेंबरमधून जाणाऱ्या 3.5 किमी जुन्या पाइपलाइनचे पुनर्बांधणी केली. गेल्या महिन्यात काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना आता दोन ते अडीच तास स्वच्छ, पिण्यायोग्य पाणी मिळू लागले आहे.

Gold Rate
24 May 2025
Gold 24 KT 96,300/-
Gold 22 KT 89,600/-
Silver/Kg 98,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कळमणा NIT कमांड एरिया (गणेश नगर, चित्रशाळा नगर, अन्नपूर्णा नगर): पूर्वी येथे केवळ 1 तास पाण्याचा पुरवठा होत असे. OCW ने येथे 400 मिमी, 300 मिमी आणि 150 मिमी व्यासाच्या पाइपलाइनमधील गळती बंद करून सुधारणा केली. वितरण संतुलित करण्यासाठी इंटरकनेक्शन केले. तसेच कळमणा फीडर सुरू केल्यानंतर कळमणा NIT आणि वांजरी CA यामधील आयसोलेशन देखील करण्यात आले. 10/05/2025 पासून पुरवठा वेळ दीड ते दोन तासांपर्यंत सुधारला आहे.

बोरीयापुरा फीडर कमांड एरिया (गोळीबार चौक, कुंभारपुरा): या परिसरात पूर्वी दोन तास पाणीपुरवठा होत होता. OCW ने येथे सब-झोनिंग, आयसोलेशन आणि पॉकेटिंग करून प्रणाली सुधारली. आता पाणीपुरवठा वेळ तीन ते चार तासांपर्यंत वाढवण्यात यश आले आहे.

शांतिनगर कमांड एरिया (रामसुमेर बाबा नगर): येथे पूर्वी अपुरा पाणीपुरवठा होत होता – फक्त दोन तास पुरवठा होत असे. OCW ने 1.5 किमी जुन्या पाइपलाइनची पुनर्बांधणी केली जी सांडपाणी चेंबरमधून जात होती. गेल्या दोन महिन्यांपासून येथे स्वच्छ, सुरक्षित पिण्याचे पाणी अडीच ते तीन तासांपर्यंत मिळू लागले आहे.

OCW नागपूरकरांना अखंड, स्वच्छ आणि संतुलित पाणीपुरवठा देण्यास कटिबद्ध आहे. या कामांमुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था आणखी मजबूत होणार असून नागरी जीवनमानात सुधारणा होईल.

पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.

Advertisement
Advertisement
Advertisement