Published On : Wed, Jan 22nd, 2020

मनपा-OCW ची जलकुंभ स्वच्छता मोहीम 23, 27, 29 व 31 जानेवारी रोजी नेहरू नगर झोनमध्ये

Advertisement

नंदनवन (नवीन) जलकुंभ 23 जानेवारी रोजी, दिघोरी (ताजबाग) 27जानेवारी रोजी, नंदनवन 29 जानेवारी व खरबी जलकुंभ 31 जानेवारी रोजी
नागपूर, 22 जानेवारी, 2020: लक्ष्मी नगर झोन, लकडगंज झोन, हनुमान नगर झोन, धंतोली झोन येथील जलकुंभ स्वच्छता मोहिमेनंतर आता नागपूर महानगरपालिका व OCW यांनी ही मोहीम नेहरू नगर झोनमध्ये सुरु करण्याचे ठरविले आहे. याअंतर्गत नंदनवन (नवीन) जलकुंभ 23 जानेवारी (गुरुवार ) रोजी, दिघोरी (ताजबाग) २७ जानेवारी (सोमवार) रोजी, नंदनवन २९ जानेवारी (बुधवार) व खरबी जलकुंभ ३१ जानेवारी (शुक्रवार) रोजी स्वच्छ करण्यात येणार आहेत.

नंदनवन (नवीन) जलकुंभ स्वच्छतेमुळे 23 जानेवारी रोजी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: शेष नगर, शक्तीमाता नगर, विद्या नगर, श्रीकृष्ण नगर, संकल्प नगर, सिद्धेश्वर नगर, न्यू डायमंड नगर, संताजी नगर, गोपालकृष्ण नगर, वृंदावन नगर.

दिघोरी (ताजबाग) जलकुंभ स्वच्छतेमुळे सोमवार २७ जानेवारी रोजी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: निराला सोसायटी, सर्वश्री नगर, प्रगती कॉलोनी, गौसिया कॉलोनी, वैभव नगर, कीर्ती नगर, टेलिफोन नगर, बेलदार नगर, गजानन नगर, महानंदा नगर, राहुल नगर, रामकृष्ण नगर, संत तुकडोजी नगर, गोपाळकृष्ण लेआऊट.

नंदनवन (राजीव गांधी नगर) जलकुंभ स्वच्छतेमुळे बुधवार २९ जानेवारी रोजी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: बापू नगर, भांडे प्लॉट, हरपूर नगर, मिरे लेआऊट, गुरुदेव नगर, प्रेम नगर, संतोषीमाता नगर, सिंधीबन, कबीर नगर.

खरबी जलकुंभ स्वच्छतेमुळे शुक्रवार ३१ जानेवारी रोजी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: ऑरेंज नगर, अनमोल नगर, चैतन्येश्वर नगर, लता मंगेशकर नगर, गिद्दोबा नगर, शारदा नगर, कीर्तीधर सोसायटी, राधाकृष्ण नगर, लोक-कल्याण नगर, साईबाबा नगर.

या कामांदरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नसल्याने मनपा-OCW यांनी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे
दाभा जलकुंभावर १२ तासांचे शटडाऊन २३ जानेवारी रोजी

नागपूर, २२ जानेवारी २०२०: मनपा-OCW यांनी दाभा जलकुंभाच्या आऊटलेटवरील नादुरुस्त व्हॉल्व बदलण्यासाठी २३ जानेवारी रोजी १२ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरवले आहे. हे काम २३ जेवारी रोजी सकाळी १० वाजता सुरु होईल.

या कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: भिवसेनखोरी, हजारीपहाड, चिंतामण नगर. गौतम नगर, गायत्री नगर, आशा बालवाडी परिसर, कुष्ण नगर, सरोज नगर, मनोहर विहार, संतकृपा सोसायटी, प्रीति को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शिवपूर्ण सोसायटी, वराडकर लेआऊट, नशेमन सोसायटी, शशिकांत सोसायटी, अनुपम सोसायटी, गंगा नगर, कोलबास्वामी नगर, डुंबरे लेआऊट, वेलकम सोसायटी, KGN सोसायटी, अखिल विश्वभारती सोसायटी, जगदीश नगर, मकरधोकडा.