Published On : Sat, Aug 22nd, 2020

आंतरजोडणीसाठी १२ तासांचे राम नगर जलकुंभ शटडाऊन २४ ऑगस्टला

Advertisement

धरमपेठ, शंकर नगर, गांधी नगर चा पाणीपुरवठा सोमवारी राहणार बाधित

नागपूर: ४५० मिमी व्यासाच्या फीडर लाईनवर बाजीप्रभूंच्या पुतळ्याखाली उद्भवलेल्या गळतीमुळे वाया जाणारे पाणी थांबविण्यासाठी नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी नुकतीच ‘डायव्हर्शन’ वाहिनी टाकलेली आहे.

Gold Rate
04Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,48,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या वाहिनीची पाणीपुरवठ्यावर काहीही परिणाम न होऊ देता ३ ठिकाणी आंतरजोडणी करण्यात आलेली आहे. आता ४५०x३०० मिमी ची मोठी आंतरजोडणी, ज्यामुळे गळतीच्या समस्येचे पूर्ण निराकरण होणार आहे, त्यासाठी मनपा-OCWने सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते रात्री १० दरम्यान १२ तासांचे शटडाऊन हाती घेण्याचे ठरविले आहे.

या कामांमुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: हिल रोड, गांधी नगर, शंकर नगर, कोर्पोरेशन कॉलोनी, दंडीगे लेआऊट, त्रिकोणी पार्क, धरमपेठ एक्स्टेंशन, धरमपेठ सिमेंट रोड, डागा लेआऊट, माता मंदिर रोड, भागवाघर लेआऊट, शिवाजी नगर, ई.

शटडाऊन दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Advertisement