Published On : Wed, Jul 20th, 2022
By Nagpur Today Nagpur News

शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी आरक्षण

Advertisement

– माजीमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे
– माविआ नेत्यांनी जाणीवपूर्वक अडवले होते आरक्षण

नागपूर : अडीच वर्षांपासून मागील सरकारने हिरावलेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा आज मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकार येताच दिल्लीत जाऊन वकिलांकडे पाठपुरावा केला. शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी आरक्षण मिळाले. उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्यामुळे अडीच वर्षे आरक्षण मिळाले नाही, असा आरोप माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला.

Gold Rate
Aug 4 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,400 /-
Gold 22 KT ₹ 1,33,100 /-
Silver/Kg ₹ 2,21,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, बांठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. त्यामुळे आता २७ टक्के राजकिय आरक्षण ओबीसी समाजाला मिळेल. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना न्याय दिला. मागील अडीच वर्षांपासून आम्ही संघर्ष करीत होतो. माझी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात मध्यस्थी याचिका होती.

Advertisement

आज दिलासा मिळाला. हा लढा आम्ही जिंकलो, पण यासाठी उद्धव ठाकरे व अजित पवार सरकारला जावे लागले अन शिंदे-फडणवीस सरकारला यावे लागले. उद्धव ठाकरे सरकार असते तर हा लढा जिंकणे अशक्य होते. या मविआ सरकारला ओबीसींना न्याय द्यायचाच नव्हता. शिंदे-फडणवीस सरकार येताच दिल्लीत जाऊन वकिलांकडे पाठपुरावा केला. ओबीसी समाजाला केवळ देवेंद्र फडणवीसच न्याय देतील, हे यापूर्वीही आम्ही स्पष्ट केले होते. त्यांनी तसेच राज्यातील भाजपच्या सर्व नेत्यांनी अडीच वर्षे संघर्ष केला, ओबीसी समाज, संघटनांनी संघर्ष केला. त्याचे फलित म्हणजे ओबीसींना मिळालेले आरक्षण होय.

उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्यामुळे अडीच वर्षे आरक्षण लांबले. ठाकरे-पवार सरकार असते तर त्यांनी बांठिया आयोगाचा अहवाल सादर नसता केला. हा अहवाल दडपून ठेवला असता. पुढल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण मिळालं नसत. शिंदे-फडणवीस सरकारने नियुक्त वकिलांनी ओबीसींची बाजू योग्य पध्दतीने मांडली, म्हणून आरक्षण मिळाले.

आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गप्प बसावं, त्यांना आता जनता सोडणार नाही, असा टोलाही आमदार बावनकुळे यांनी लगावला. मविआमध्ये असलेल्या झारीतील शुक्राचार्यांनी आरक्षण अडविले होते. मविआला महिनाभरात आरक्षण देणे शक्य होते, पण जाणीवपूर्वक टाळले, असा आरोप त्यांनी केला. मविआच्या नेत्यांनी आता ‘चुल्लूभर’ पाण्यात बुडुन मरावं, असेही ते म्हणाले.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

नागपुर में करोड़ों की Cyber Fraud Gang का भंडाफोड़ #NagpurNews #CyberCrime #BankFraud #DigitalFraud

नागपुर में करोड़ों की Cyber Fraud Gang का भंडाफोड़ #NagpurNews #CyberCrime #BankFraud...

शराब पार्टी के बाद Murder? नागपुर में युवक की पत्थर से हत्या #NagpurNews #MurderCrime #VidarbhaNews

शराब पार्टी के बाद Murder? नागपुर में युवक की पत्थर से हत्या...

पार्सल देने के बहाने बुजुर्ग की सोने की चेन लूटी! #NagpurNews #ChainSnatching #DeliveryBoy #Crime

पार्सल देने के बहाने बुजुर्ग की सोने की चेन लूटी! #NagpurNews #ChainSnatching...

30.60 लाख का मुद्देमाल जब्त ; दो अलग-अलग कार्रवाई में एमडी ड्रग्स के साथ तीन आरोपी #nagpurnews

30.60 लाख का मुद्देमाल जब्त ; दो अलग-अलग कार्रवाई में एमडी ड्रग्स...

आधी रात घर में घुसा जहरीला मण्यार (Krait) सांप! #NagpurNews #SnakeRescue #Manyar #Snake #Wildlife

आधी रात घर में घुसा जहरीला मण्यार (Krait) सांप! #NagpurNews #SnakeRescue #Manyar...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges