Published On : Sat, Sep 30th, 2023
By Nagpur Today Nagpur News

गांधी जयंतीला होणार ओबीसी जागर यात्रेचा शुभारंभ..

• उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे आणि इतर मोठ्या नेत्यांचा यात्रेत सहभाग.

संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करणाऱ्या भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेचा शुभारंभ ०२ ऑक्टोबर २०२३, गांधी जयंतीच्या दिवशी करण्यात येत आहे. बापुकुटी, सेवाग्राम येथे सकाळी ९.०० वाजता नतमस्तक होऊन तसेच त्यानंतर हिंगणघाटच्या पारडी गावाजवळ ओबीसी समाजाच्या सर्व घटकांचा भव्य मेळावा आयोजित करून या यात्रेचा खऱ्या अर्थाने शुभारंभ होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष श्री. हंसराजजी अहीर, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री. भागवतरावजी कराड, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. ही यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील ११ही जिल्हे पादाक्रांत करेल. पहिल्या टप्प्याचा समारोप उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी, जि. वाशीम येथे होईल.

“ओबीसी जागर यात्रेची सुरुवात हिंगणघाटपासून होत असून यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, रामटेक, काटोल, अकोला, शेगाव, वाशीम असा या यात्रेचा मार्ग राहील. नवरात्रानंतर उत्तर महाराष्ट्रात ही यात्रा सुरु राहील. भाजपा सत्तेत असून राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या हितासाठी ज्या योजना राबविल्यात आणि जे कार्य केले, त्याबद्दल ओबीसी समाजाला माहिती मिळावी, हा या ओबीसी जागर यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. जनतेने मोठ्या प्रमाणात या यात्रेत सहभागी व्हावे आणि ओबीसींचा आवाज बुलंद करावा”, असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी केले आहे.

Gold Rate
12 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,100 /-
Gold 22 KT ₹ 1,02,400 /-
Silver/Kg ₹ 1,28,300/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

(सोबत ओबीसी जागर यात्रेचे वेळापत्रक जोडले आहे.)
संपूर्ण यात्रेदरम्यान आपले मीडिया आणि वर्तमानपत्र प्रतिनिधी पाठवून या यात्रेला प्रसिध्दी द्यावी, ही नम्र विनंती.

Advertisement
Advertisement