ओबीसी बांधंवानी साजरी केली डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती
वर्धा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्त्मा फुले यांच्या विचारांची आज बहुजन समाजाला अत्यंत गरज आहे व त्यांच्या विचारांपासून प्ररेणा घेण्याची आजच्या तरुणांना आवश्यकता असल्याचे प्रतिपादन बहुजन समाज चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व विचारवंत गुणवंतराव डकरे यांनी आज गोंडप्लॉट येथील ओबीसी जनजागृती संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या व्याख्यानपर भाषणात केले.
दि.१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सव गोंडप्लॉट येथे सहया गे क्लासेसच्या प्रांगणात ओबीसी जनजागृती संघटनेच्या वतीने घेण्यात आला. यावेळी प्रा. उल्हास लोहकरे यांनी सुध्दा आपले परखड परंतु सत्य मत मांडले. आजच्या बहुजन समाजाच्या पिढीने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा का घ्यावी व त्यांच्या विचारांची काय गरज आहे, हे प्रा. उल्हास लोहकरे यांनी उपस्थित असलेल्या समस्त बालगोपाल व उपस्थित श्रोत्यांना समजेल अशा भाषेत पटवून सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटक अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा तर अध्यक्ष श्यामभाऊ भेंडे होते. प्रमुख वक्ते गुणवंतराव डकरे व प्रा. उल्हास लोहकरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राजुभाऊ वंजारी, प्रभाकरराव हिवंज, शेख मेहमुद व विनय डहाके मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे, हा कार्यक्रम समस्त ओबीसी समाज बांधवांनी प्रायोजीत केला होता व त्यात सर्व श्रोत्यांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद होता. या महोत्सवामध्ये चित्रकला स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, वेशभुषा स्पर्धेचा समावेश होता. त्याचप्रमाणे वृक्ष संवर्धन, जलसंवर्धन, पक्षी संवर्धन, महान पुरुषांचे जीवन व कार्य अशा प्रकारच्या विषयांना धरुन ज्ञानवृध्दी व समोरच्या पिढीला चांगल्या विचारांची प्रेरणा देणारे विषय होते.
पाहुण्यांचा परिचय व स्वागत ओबीसी जनजागृती संघटनचे संघटक अजयभाऊ भेंडे यांनी तर प्रास्तावीक संघटनचे कार्यशील सदस्य राजुभाऊ धोटे यांनी करतांना बहुजन समाज हीताच्या दृष्टीने युवकांनी कसे कार्यरत राहावे याच संदेश दिला.
निवेदन राजीव भोमले यांनी करतांना हा एक एैतिहासीक कार्यकम सोहळा व आपल्या ओबीसी भागात झालेला प्रथमच संयुक्त महोत्सव आहे असे संबोधले. यात महत्वाचे योगदान अतुल तराळे, अजय वरटकर, श्रीकांत भेंडे, केवल दुर्गे, धनंजय नाखले, बाळासाहेब वानखेडे, प्रवीण कडू व शेख मोहम्मद यांनी केले. या संयुक्त महोत्सवाद्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धेकरीता चित्रकला- सौ. नलिनी बर्वे, सामान्य ज्ञान- रवी देशमुख, दिनेश देशमुख तसेच वेषभुषा- राजु बावणे, मेघा उपकर व कु. स्मिता वानखेडे यांनी परीक्षक म्हणून सहकार्य केले.
आयोजक व नियोजक यात अजय भेंडे, राजू धोटे, राजीव भोमले, सोमंत फुटाणे, रवी देशमुख, प्रशांत वाटाणे, रवीभुषण तांगडे, सुर्यप्रकाश पांडे, संजय तिळखे, विवेक वझरकर व वार्डातील नागरिकांचा सहभाग होता.सर्व मान्यवर व्यक्तींनी बाबासाहेबांची तसेच महात्मा फुले यांच्या कारकीर्दीवर तसेच त्यांच्या विचारांवर आज सामाजाला त्यांच्या विचारांची कशी आवश्यकता आहे याची जाणीव करुन दिली व या विचारांना आपण घेवून जीवनात त्या विचारांचा उपयोग करावा, अशी अपेक्षा दर्शविली.