Published On : Mon, Dec 10th, 2018

दिघोरी व बिढीपेठ परिसरातील एकूण ९ अनधिकृत धार्मिक स्थळावर नासुप्रची कार्यवाही

नागपूर : मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्री. अश्विन मुद्द्गगल यांच्या निर्देशाप्रमाणे व अधिक्षक अभियंता (मुख्यालय) श्री. सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात दिनांक १०.१२.२०१८ रोजी नागपूर सुधार प्रन्यासच्या दक्षिण विभागातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात आली.

मौजा दिघोरी व बिढीपेठ येथील
१) हनुमान मंदिर, साई सेवाश्रम सोसायटी, दिघोरी
३) हनुमान मंदिर, योगेश्वर नगर, दिघोरी
३) जनजागृती हनुमान मंदिर, सेनापती नगर, दिघोरी
४) गणेश, देविंची मूर्त्या आणि हनुमान मंदिर, तिरुपती को.ऑप. हौ. सोयायटी, बिढीपेठ
५) शिवलींग, तिरुपती को.ऑप. हौ. सोयायटी, बिढीपेठ
६) नागोबा मंदिर, बंधु गृह निर्माण सहकारी संस्था, बिढीपेठ
७) संत गजानन महाराज देवस्थान, डायमंड को. ऑप. सोसायटी, बिढीपेठ
८) दुर्गा माता मंदिर, व्हेजिटेबल मार्केट, बिढीपेठ
९) नाग मंदिर, शिवसुंदर नगर, दिघोरी

या धार्मिक स्थळांचा समावेश होता. तत्पूर्वी नासुप्रच्या क्षतिपथकांना नागरिकांनी मदत केली त्यांनी सामंजस्यपणा दाखवित मंदिरामधील मूर्ती स्वतः काढून घेतल्या व मंदिर रिकामे करून दिले. अश्या एकूण ९ धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही ३ टिप्पर आणि २ जेसीबी च्या साहाय्याने आज सकाळी १०.३० ते सायकांळी ६.०० वाजेपर्यंत करण्यात आली.

तसेच मौजा टाकळी येथील गोरले लेआऊट मधील अनधिकृत बांधकाम व देशी दारूचे शटर हटविण्यात आले.

यावेळी नासुप्रच्या दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता श्री. एस एन चिमुरकर, विभागीय अधिकारी (दक्षिण) श्री अविनाश प्र बडगे, सहायक अभियंता श्रेणी-२ श्री. संदीप एम राऊत, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक श्री रवी रामटेके, श्रीमती सारिका बोरकर, नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख श्री.मनोहर पाटील तसेच हुडकेश्वर पोलीस स्टेशन, नंदनवन पोलीस स्टेशन आणि सक्करदरा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.