Published On : Fri, Feb 14th, 2025
By Nagpur Today Nagpur News

आता खऱ्या अर्थाने 26/11 ला न्याय मिळेल; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास, अमित शाह यांच्या भेटचे कारणही केले स्पष्ट

Advertisement

नवी दिल्ली : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबतही त्यांनी प्रसार माध्यमांना भाष्य केले.

सन २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याच्या आरोपी संदर्भातही त्यांनी आपले मत मांडले.

Gold Rate
17 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,42,600/-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,83,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सन २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याच्या आठवणींची जखमी प्रत्येक मुंबईकरांच्या मनात आहे. शेकडो निरपराध्यांचे प्राण घेणाऱ्या या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा तहव्वूर राणा या दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात देण्यास अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे. २६/११चा अपराधी, मास्टरमाइंड तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेने होकार दिला आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. यासाठी अमेरिकी प्रशानसाला तयार केले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो.

मागच्या काळात आम्ही प्रयत्न करून त्याची ऑनलाइन साक्ष मिळवू शकलो, त्यामुळे पाकिस्तानचा या हल्ल्यातील हात असल्याचे दाखवू शकलो. तो भारताचा अपराधी आहे, त्यामुळे भारताला तो अपराधी म्हणून उपलब्ध झाला पाहिजे. त्याला शिक्षा देता आली पाहिजे, अशी आपली मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ती मागणी रेटली आणि तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता मिळाली आहे. २६/११ ला आता खरा न्याय मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या झालेल्या भेटीबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जे तीन नवे कायदे तयार झाले आहेत, त्या तिन्ही कायद्यांसंदर्भात एक आढावा बैठक अमित शाह यांनी घेतली. हे तीन कायदे तयार झाल्यानंतर राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी कशी झाली आहे? त्याकरिता ज्या इन्स्टिट्युशन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचे होते. त्याची तयारी किती झाली आहे? किती केस रजिस्टर झाल्या त्याची माहिती घेतल्याचे फडणवीस म्हणाले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement