Published On : Fri, Sep 21st, 2018

सचिव नाही, सहायक म्हणून सोबत नेले : महापौर नंदा जिचकार

Advertisement

नागपूर : सनफ्रॅन्सिस्कोमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनात ग्लोबल कन्व्हिनिअंट आॅफ मेयर्स आॅप क्लायमेट अँड एनर्जी (जिकॉम) संस्थेच्या वतीने दक्षिण आशियाच्या प्रतिनिधीच्या रूपाने सहभागी झाले. संमेलनात जिकॉमच्या बोर्ड आॅफ डायरेक्टरच्या बैठकीत सहभाग घेतला. मुलाला खासगी सहायक (पर्सनल असिस्टंट)च्या रूपाने सोबत नेले, खासगी सचिवाच्या (प्रायव्हेट सेक्रेटरी) रूपाने नेले नाही, अशी माहिती महापौर नंदा जिचकार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

विदेश दौऱ्यावर मुलाला खासगी सचिव म्हणून नेल्याच्या प्रकरणी नागपुरात पोहोचल्यानंतर जिचकार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, व्हिसा तयार करतानाही मुलगा म्हणूनच दर्शविले. आयोजकांनाही याबाबतची माहिती दिली. कुणालाच काही आक्षेप नव्हता. महापालिकेच्या खर्चाने गेलेली नव्हती. अशात मी काहीच चूक केली नाही. त्या म्हणाल्या, महापालिकेत उपायुक्त रंजना लाडे यांनाच सर्वात आधी सोबत चालण्यास म्हटले होते. परंतु आयुक्त नसल्यामुळे त्यांना परवानगी मिळाली नाही. नगरसेविका चेतना टांक आणि रूपा राय यांच्याशीही चर्चा केली. परंतु वैयक्तिक कारणांमुळे त्याही आल्या नाहीत. लांबचा आठ दिवसांचा प्रवास असल्यामुळे आणि बैठकीत पर्यावरणावर सादरीकरण करावयाचे असल्याने जाणकार व्यक्तीची गरज होती.

महापालिकेत कुणीही जाणकार आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती भेटली नाही. मुलगा प्रियांश सोशल मीडिया सांभाळतो. खासगी सहायकाची अनेक कामे तो पार पाडतो. तो प्रशिक्षित आहे. त्यामुळे आयोजकांना सूचना देऊन त्यास खासगी सहायक म्हणून नेले. अमेरिकन अ‍ॅम्बेसीपासून जिकॉम, आयोजन समिती सर्वांनाच प्रियांशबाबत सत्यता माहीत आहे. फक्त पक्ष स्तरावर माहिती दिली नाही. व्हिसा तयार करताना महापालिकेचा पत्ता आयोजकांकडे आधीच होता. त्यामुळे त्यांनी त्याच पत्त्यावर प्रियांशचे पत्र पाठविले. यात काहीच चुकीचे नाही. यात महापालिकेचा पैसा खर्च झाला नाही. आयोजकांनाही याबाबत माहिती होती. प्रियांशने केअर टेकरची भूमिका पार पाडल्याचे त्यांनी सांगितले.

पक्ष महापौरांसोबत : संदीप जोशी
विदेश दौऱ्यावर मुलाला सोबत नेल्याच्या प्रकरणी महापौर जिचकार सर्वात आधी नितीन गडकरींना भेटल्या. या भेटीबाबत सत्तापक्ष नेता संदीप जोशी म्हणाले, या प्रकरणाची माहिती गडकरींना देण्यात आली. दौरा खासगी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला होता. यात महापालिकेची रक्कम खर्च झाली नाही. त्यामुळे भाजपा महापौरांसोबत आहे. विरोधी पक्षाने चर्चा घडविल्यास पक्ष आपली बाजू मांडणार आहे. यात काहीच चुकीचे झाले नाही.

महापौरांना दिली समज : कोहळे
भाजपाचे शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी सांगितले की, नागपूरला पोहोचल्यानंतर महापौरांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट झाली. गडकरींनी महापौरांना पारदर्शकता ठेवण्याबाबत समज दिली. कोणत्याही दौऱ्याची माहिती पक्षाला असली पाहिजे. पत्र तयार करताना लक्ष देण्याची गरज आहे. चुकीचा संदेश जावयास नको. काही वेळेपूर्वी महापौरांमुळे पार्टीचे नुकसान झाल्याचे बोलणाऱ्या आमदार कृष्णा खोपडे यांचा सूरही बदलला. त्यांनी सांगितले, दौऱ्यात महापालिकेचा आणि शासनाचा पैसा लागला नव्हता. मुलाला त्या सहायकाच्या रूपाने घेऊन गेल्या. यात काहीच चुकीचे नाही. परंतु पक्षाला माहिती असणे आवश्यक होते.