Published On : Thu, Jul 23rd, 2020

उत्तर नागपूर युवक काँग्रेसतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नागपूर : नुकत्याच लागलेल्या उच्चमाध्यमिक शालांत परीक्षांच्या (१२ वी) निकालात गुणवत्ता यादीत येण्याचा मान पटकाविणाºया गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा उत्तर नागपूर युवक कॉंग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला.

सदर सत्कार समारंभ शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व विधानसभा आमदार विकास ठाकरे, शहर महासचिव पंकज लोणारे यांच्या मार्गदर्शनात उत्तर नागपूर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अनमोल लोणारे यांच्या नेतृृत्वात आयोजित करण्यात आला. दरम्यान आचल ठवरे, विवेक भोपाले, प्रतीक्षा लांजेवार, प्रीयांशू शेंडे, अंशिका गुप्ता, शाहीन खान आदी १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व स्मृृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनमोल लोणारे यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील उज्वल भविष्याच्या शुभेच्छा देत, उच्च शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता सुमित चव्हाण, विक्की शेंडे, प्रज्वल लांजेवार, पायल शेंडे, स्वाती गणवीर, गंगूबाई शेंडे, सीताबाई उके, बादल शेंडे, अपेक्षा जनबंधू, प्रीती जनबंधू आदी उपस्थित होते.